शिक्षकांची जुनी पेन्शन योजना निवृत्तिवेतन नंतर शिक्षकांचा सन्मानाने जगण्याचा अधिकार -माजी शिक्षक आमदार दत्त्तात्रय सावंत

पंढरपूर प्रतिनिधी- शिक्षक हा समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करताना शिक्षक आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्रासाठी समर्पित करतात, मात्र, निवृत्तीनंतर शिक्षकांचा सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे.आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी शिक्षकांकडून होत आहे. जुनी पेन्शन योजना ही शिक्षकांचा हक्क असून शिक्षकांना ती मिळालीच पाहिजे, अशी आपली प्रामाणिक भावना असल्याची भूमिका माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी मांडली आहे. शिक्षकांचे भविष्य सुरक्षित असणे आवश्यक असून निवृत्तीनंतर सन्मानाने जीवन जगण्यासाठी पेन्शन हा महत्त्वाचा आधार आहे. औषधोपचार, दैनंदिन खर्च आणि कुटुंबाच्या जबाबदान्या पूर्ण करण्यासाठी नियमित उत्पन्नाची गरज असते. त्यामुळे या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने पाहून सकाराम्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांचा प्रश्न चर्चेत राज्यात १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या, मात्र विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित सेवेमुळे जुन्या पेन्शनच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शिक्षकांचाही प्रश्न अनेक वर्षापासून चर्चेत आहे. नियुक्तीची तारीख, अनुदानाची स्थिती आणि लागू शासन निर्णय विचारात घेऊन पात्र शिक्षकांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यतत होत आहे. शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा शिक्षकांच्या सेवेला योग्य न्याय मिळावा आणि निवृत्तीनंतर त्यांचे जीवन सुरक्षित भवावे, यासाठी शासनाने पेन्शनविषयक प्रश्न प्राधान्याने सोडवावा, अशी मागणी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form