सकल भारतीय सोनार समाज संघटन* तर्फे नवनियुक्त जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांचे स्वागत आणि *सोनार, सोनी स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्रा* चे धुळ्यात उद्घाटन

धुळे, दि. २९ मे २०२५ (प्रतिनिधी)
*- येथे *सुवर्णकन्या  भाग्यश्रीताई विसपुते* ह्यांची *जिल्हाधिकारी* म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयात *सकल भारतीय सोनार समाज संघटन* चे संस्थापक मिलिंदकुमार सोनार (नाशिकरोड), धुळे येथील *सोनार, सोनी, स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्र* चे समन्वयक ॲड डॉ राजेंद्र निकुंभ, सहसमन्वयक ॲड अमित मधुकर दुसाने, वलवाडी (धुळे) येथील ज्येष्ठ सोनार समाजसेवक तसेच वलवाडी अहिर सुवर्णकार समाज संस्थेचे अध्यक्ष श्री विजयानंद मोरे, खजिनदार श्री दिलीप रणधीर, युवा सोनार समाजसेवक श्री विजय वाघ, योगेश विभांडिक, कु. ऊर्वी विजयानंद मोरे यांनी दिनांक २८ मे २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता समक्ष भेट घेऊन स्वागत केले. यावेळी याप्रसंगी संस्थापक मिलिंदकुमार सोनार यांनी सर्व शाखीय सोनार समाजाचे प्रबोधन आणि समुपदेशन करणारे व्यासपीठ म्हणून *सकल भारतीय सोनार समाज संघटन* चा थोडक्यात परिचय करून दिला. धुळे येथे दिनांक २९ मे २०२५ रोजी सायंकाळी इंदिरा हौसिंग सोसायटी, गोंदुररोड, देवपूर, धुळे येथे *सकल भारतीय सोनार समाज संघटन* चे संकल्पनेतून सर्व शाखीय सोनार समाजासाठी *सोनार, सोनी, स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्र*   सुरू होत आहे, याबद्दल जिल्हाधिकारी भाग्यश्रीताई विसपुते यांनी समाधान व्यक्त केले. केवळ सोनार समाजासाठीच नव्हे, तर प्रत्येक समाजासाठी असे विधी सल्ला समुपदेशन केंद्र सुरू झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
गुरुवार दिनांक २९ मे २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता देवपुरात दत्तमंदिर चौकजवळील इंदिरा हौसिंग सोसायटी मधील प्लॉट क्रमांक ५६ *राजरजनी* येथे *सकल भारतीय सोनार समाज संघटन* तर्फे धुळे येथील ज्येष्ठ सोनार समाजसेवक तसेच आध्यात्मिक समुपदेशक, पत्रकार नानासाहेब श्री रमेश पोतदार आणि धुळे येथील विधी सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या सोनार समाज भगिनी ॲड रेखाताई विसपुते यांच्या  हस्ते *सोनार, सोनी, स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्र (कानूनी परामर्श केंद्र)* चे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. 
संस्थापक मिलिंदकुमार सोनार यांनी प्रास्ताविकात सर्व शाखीय सोनार समाजासाठी *समाजप्रबोधन आणि समुपदेशन करणारे एकमेव व्यासपीठ* म्हणून *सकल भारतीय सोनार समाज संघटन* ची थोडक्यात माहिती देताना सांगितले की, सर्व शाखीय सोनार समाजाचे सामाजिकदृष्ट्या अभेद्य संघटन व्हावे आणि सामूहिक प्रयत्नांतून आपल्या समाजातील विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी *सेतुबंधन* ही संकल्पना मांडली असून, या संकल्पनेस विविध सोनार समाज संस्था आणि संघटना यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले. 

उद्घाटक म्हणून उपस्थित समाजबांधवांना संबोधन करताना श्री पोतदार म्हणाले की, सामाजिक एकता ही काळाची गरज बनली आहे. प्रत्येकाने सामाजिक भान ठेवून वागले, तर समाजातील वाद विकोपाला जाणार नाहीत. सर्व शाखीय सोनार समाजास समाजप्रबोधन आणि समुपदेशन यांची अनिवार्य गरज असल्याचे प्रतिपादन केले. मिलिंदकुमार सोनार यांनी काळाची अनिवार्य गरज ओळखून *सकल भारतीय सोनार समाज संघटन* हे *समाजप्रबोधन आणि समुपदेशन करणारे व्यासपीठ* उभे केले आहे, ही समाजासाठी दिलासादायक बाब असून, ती भूषणावह आहे. सोनार समाजघटकांना *सोनार , सोनी, स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्रा* चा निश्चितच लाभ होईल. या केंद्रातर्फे विधी सल्ला समुपदेशन विनामूल्य उपलब्ध होणार आहे, ही समाजासाठी दिलासादायक बाब असल्याचेदेखील नानासाहेब रमेश पोतदार यांनी सांगितले.
 याप्रसंगी जमलेल्या सर्व समाजबांधवांनी *सोनार, सोनी, स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्रा* चे *जिल्हा समन्वयक* म्हणून ॲड.(डॉ.) राजेंद्र निकुंभ यांची, तर *जिल्हा सहसमन्वयक* म्हणून ॲड.अमित दुसाने यांची एकमताने निवड केली.
 
वकीलद्वयांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की आपल्या समाजातील पोटजातीच्या विविध संघटना चांगले काम करीत आहेत. परंतु सगळ्या पोटजातींना एकत्र आणून समाजाची व्याप्ती वाढवावी लागेल. त्यासाठी समाजातील रोटी - बेटी व्यवहार, विवाहपूर्व व विवाहोत्तर समुपदेशनाची प्रत्येकालाच खूप आवश्यकता आहे. सोनारी काम करणाऱ्या युवकांना कामकाजाच्या दृष्टीने आवश्यक सल्ला व समुपदेशन आवश्यक आहे. काहीवेळा कौटुंबिक व सामाजिक समस्या व वाद वाढून कोर्टापर्यंत जातात. असे वाद वाढून संबंधित समाजघटकाची नाहक बदनामी होते. पैशांचा अपव्यय होतो. मानसिक त्रास होतो. हे सगळे टाळण्यासाठी समाजातील वाद समाजातच कसे मिटतील, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्याकरीताच विधी सल्ला व समुपदेशन केंद्राची स्थापना झाली आहे. समाजातील ज्या बांधवांचे काही कौटुंबिक वाद, कोर्टकचेरी चालू असेल, कामासंदर्भात कायदेविषयक काही समस्या निर्माण झाली असेल, अश्या समाजबांधवांना ह्या केंद्रातून नि:स्वार्थ भावनेने विनामूल्य मार्गदर्शन मिळणार आहे. सर्व शाखीय सोनार समाज बांधव आणि भगिनी यांनी प्लॉट नं.५६ (राजरजनी), इंदिरा हौसिंग सोसायटी, दत्तमंदिर, देवपूर, धुळे येथे दर रविवारी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत प्रत्यक्ष येउन भेटावे किंवा ७५८८३१८७७७ / ८२७५००७३९० या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनदेखील केले.

यावेळी ॲड रेखाताई विसपुते म्हणाल्या की, विधी सल्ला समुपदेशन केंद्र आपल्या समाजासाठी काळाची अनिवार्य गरज असून, प्रत्येक शहर आणि महानगरात, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी *सकल भारतीय सोनार समाज संघटन* तर्फे *सोनार, सोनी, स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्र* सुरू व्हायला हवे. विवाहनिश्चिती समुपदेशन, विवाहपूर्व समुपदेशन, विवाहोत्तर समुपदेशन देखील आपल्या समाजासाठी आवश्यक असून, विवाहविषयक समस्या आणि संभाव्य घटस्फोट प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जो कृति आराखडा जाहीर करण्यात आला आहे, त्यात विवाहनिश्चिती समुपदेशन समिती, विवाहपूर्व समुपदेशन समिती, विवाहोत्तर समुपदेशन समिती यांचा समावेश आहे. दिवसेंदिवस आपल्या समाजात घटस्फोटाचे प्रमाण वाढत असून, या विधी सल्ला समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून समाजातील घटस्फोट प्रमाण कमी कसे होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
 
यावेळी *महाराष्ट्र सुवर्णकार महासंघ* चे संस्थापक अध्यक्ष श्री दिनेश विभांडिक (धुळे) म्हणाले , "*सकल भारतीय सोनार समाज संघटन* या *सर्व शाखीय सोनार समाजाचे समाजप्रबोधन आणि समुपदेशन करणाऱ्या व्यासपीठा* चे संस्थापक मिलिंदकुमार सोनार यांच्या संकल्पनेतून धुळे येथे *सोनार, सोनी, स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्र (कानूनी परामर्श केंद्र)* चे उद्घाटन होत आहे, ही धुळे जिल्ह्यातील सर्व शाखीय सोनार समाजासाठी दिलासादायक बाब आहे. या केंद्राचे *समन्वयक* म्हणून *ॲड (डॉ) राजेंद्र निकुंभ* यांची, तर *सहसमन्वयक* म्हणून *ॲड अमित मधुकर दुसाने* यांची निवड *सकल भारतीय सोनार समाज संघटन* चे संस्थापक मिलिंदकुमार सोनार यांनी केली, ती सार्थ आहे. या केंद्राच्या माध्यमातून आपल्या समाजघटकांना विनामूल्य विधी सल्ला समुपदेशन होणार आहे. या विधी सल्ला समुपदेशन केंद्राचा लाभ धुळे महानगर आणि जिल्ह्यातील सर्व शाखीय सोनार समाज बांधव आणि भगिनी यांनी घ्यावा, असे आवाहन करतो."

यावेळी युवा विधी सल्लागार ॲड प्रेम सोनार यांनी युवा पिढीला विधी सल्ला समुपदेशन केंद्राची अनिवार्य गरज असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी *महाराष्ट्र सुवर्णकार महासंघ* तसेच *स्नेहबंधन परिवार, धुळे* चे वलवाडी मंडळाचे कार्यकर्ते, युवा सोनार समाजसेवक श्री योगेश सुरेश विभांडीक म्हणाले, "माझ्या नातेवाईकांच्या समस्येचे निराकरण करताना यापूर्वी तसेच नेहमी ॲड डॉ राजेंद्र निकुंभ यांचे तसेच ॲड अमित मधुकर दुसाने, ॲड सौ प्रतिमा दुसाने यांचे निःशुल्क मार्गदर्शन लाभत असते. ज्यांच्याकडे धुळे येथील *सोनार, सोनी, स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्र* चे *समन्वयक* आणि *सहसमन्वयक* म्हणून धुरा सोपविली आहे, ते ॲड डॉ राजेंद्र निकुंभ आणि ॲड अमित मधुकर दुसाने हे दोघेही या केंद्राची सार्थकता आपल्या समाजास पटवून देतील, असा विश्वास वाटतो."

यावेळी ज्येष्ठ सोनार समाजसेवक तसेच *गोल्डन टाइम्स* चे श्री माधव विसपुते, श्री राजेंद्र विभांडिक मुकटीकर, युवा सोनार समाजसेवक ॲड प्रेम सोनार यांनीही आपले विचार मांडले.

उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ सोनार समाजसेवक श्री राजेंद्र विभांडिक मुकटीकर, ॲड सौ प्रतिमा दुसाने, सौ राधिका प्रेम सोनार, तसेच महाराष्ट्र सुवर्णकार महासंघाचे कार्यकर्ते, स्नेहबंधन परिवाराचे कार्यकर्ते, देवपूर येथील सोनार समाज बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या. वलवाडी सोनार समाज संस्थेचे खजिनदार श्री दिलीप रणधीर यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form