जुन्या पेन्शनचा लढा न्यायालयात टिकावा यासाठी अध्यादेश काढून घेणारे आमदार प्रा. जयंत आसगावकर : चेतनभाऊ नरोटे*

*शिक्षकांचे हक्क, शाळांचे संरक्षण आणि शिक्षणाच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन*
सोलापूर : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. जयंत दिनकर आसगावकर आणि सौ. हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रचारार्थ सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महेश गादेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिक्षक व पदवीधर मतदारांच्या भेटी घेऊन संवाद साधला. यावेळी दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी बोलताना चेतनभाऊ नरोटे म्हणाले की, जुन्या पेन्शनचा लढा न्यायालयात टिकावा, यासाठी तत्कालीन शिक्षणमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्याकडून अध्यादेश काढून घेण्यासाठी प्रयत्न करणारे एकमेव आमदार म्हणजे आपले प्रा. जयंत आसगावकर सर आहेत. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी, जुन्या पेन्शन योजनेसाठी आणि शिक्षकांच्या सेवाशर्तींच्या रक्षणासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारा आणि त्यांचा आवाज विधिमंडळात बुलंद करणारा प्रतिनिधी पुन्हा निवडून देणे आवश्यक आहे. काँग्रेसने आपल्या शासनकाळात शिक्षणाचे महत्त्व ओळखून शाळा सुरू केल्या आणि त्या टिकवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, भाजपच्या गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात तब्बल एक लाख शाळा बंद झाल्याचा आरोप त्यांनी केला. शिक्षकांना शाळाबाह्य कामे दिल्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवरही परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. शाळा टिकल्या तरच शिक्षकांची पदे वाढतील, टप्पा अनुदानाचा प्रश्न मार्गी लागेल आणि शिक्षणव्यवस्था सक्षम होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. शिक्षक बंधू-भगिनींनी या सर्व बाबींचा विचार करून मतदान करावे आणि आपला हक्काचा आवाज विधिमंडळात पुन्हा एकदा बुलंद करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पसंती क्रमांक १ चे मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन चेतनभाऊ नरोटे यांनी केले. या संवादावेळी माजी महापौर आरिफ शेख, माजी नगरसेवक प्रा. अशोक निंबर्गी, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक समीर मोहिते, अ‍ॅड. केशव इंगळे, प्रा. संघमित्रा चौधरी, खुद्रुस मणियार मॅडम, तिरुपती परकीपंडला, प्रशांत बाबर आणि चंद्रकांत पवार यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार : * पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ : प्रा. जयंत दिनकर आसगावकर — अनुक्रमांक १ * पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ : सौ. हर्षदा देशमुख-जाधव — अनुक्रमांक ३ शिक्षक मतदारसंघात प्रा. जयंत दिनकर आसगावकर यांच्या नावासमोर आणि पदवीधर मतदारसंघात सौ. हर्षदा देशमुख-जाधव यांच्या नावासमोर पसंती क्रमांक १ नोंदवून दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. शिक्षकांचे हक्क, शिक्षणाचा विकास आणि पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीच्या दोन्ही अधिकृत उमेदवारांना विजयी करा.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form