आजच्या वेगवान जगात नाती जपणे आणि टिकविणे ही काळाची गरज बनली आहे…
आपल्या परिवारात किती नाती आहेत? कोण कोणाचे नातेवाईक आहेत? आपल्या पूर्वजांनी कोणता इतिहास घडविला? आपले कुळ, गोत्र, कुलदेवता, कुळाचार आणि परंपरा कोणत्या आहेत?
परिवारातील प्रत्येक सदस्याचा एकमेकांशी परिचय होणे, सुसंवाद वाढणे आणि आपलेपणा जपला जाणे समाजाच्या उत्कर्षासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. परिवार सशक्त झाला, तर समाज सशक्त होईल; समाज एकत्र आला, तर राष्ट्र अधिक सक्षम होईल!
याच उदात्त हेतूने *वंशावळी डॉट कॉम (vanshavaly.com)* चे संस्थापक संचालक श्री. विकास शांताराम विसपुते गेल्या ११ वर्षांपासून अत्यंत समर्पितपणे फोटोंची *डिजिटल वंशावळी (वंशवृक्ष)* तयार करण्याचे महत्वाचे कार्य करत आहेत. परिवाराच्या सर्व स्त्री-पुरूष सदस्यांचे फोटो व कौटुंबिक माहिती एकत्र करून ते आपल्या परिवाराचा संपूर्ण इतिहास जतन करून, वंशवृक्ष तयार करून देतात. ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून फोटोंच्या वंशावळीचे घरी भिंतीवर सुशोभित करण्यासाठीचे सुंदर पोर्ट्रेट तयार करून देतात. तयार केलेली वंशावळी डिजिटल स्वरूपात कधीही, कुठेही पाहता येते, नातेवाईक व मित्रांना मोबाईलवर सहज share करता येते तसेच तयार केलेली वंशावळी घराच्या-घरी मोबाईलवर सहज अपडेट करता येते. तसेच वंशावळीमुळे परिवारातील मुला-मुलींचे योग्य विवाहसंबंध जुळविणे सुलभ होते.
पूर्वजांनी सुरू केलेल्या पूजा, कुळाचार, प्रथा, गोत्र, कुलदेवी-कुलदैवत, परंपरा व संस्कृती आपण पुढील पिढ्यांपर्यंत अभिमानाने पोहोचवू शकतो.
हे “परिवार जोडो--समाज जोडो” अभियान खऱ्या अर्थाने समाजाला एकत्र आणणारे ठरू शकते.
या उपक्रमासाठी श्री. विकास विसपुते यांनी संपूर्ण भारतातील तीर्थक्षेत्रांनां भेटी देऊन, ४ वर्षे संशोधन केले आहे. काशी, हरिद्वार, प्रयागराज, पुष्कर, कुरुक्षेत्र (पेहवा), किशनगड, गया, ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथ, देवप्रयाग, शक्तीपीठ ज्वालाक्षीमाता, चिन्तपुर्णी आदी पवित्र स्थळांवरील भाट, पांडे, पंडित यांच्याशी collaboration करून त्यांनी "वंशावळी डॉट कॉम" (vanshavaly.com) चे काम हाती घेतले. या कार्यास त्यांना सर्व भाटांचे सहकार्य मिळते.
आजच्या पिढीने आपल्या नात्यांची ओळख जपण्यासाठी वंशावळी नक्की तयार करुन घेतल्यास वर्षानुवर्षे संग्रही राहुन पुढील अनेक पिढयांना उपयुक्त ठरेल.
*आपल्या भावी पिढ्यांसाठी वंशावळी डॉट कॉम, पुणे च्या माध्यमातून डिजिटल वंशावळी (वंशवृक्ष) सवलतीच्या दरात तयार करून घेण्यासाठी श्री. विकास शांताराम विसपुते, पुणे यांना +9195956 99553 या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.vanshavaly.com या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे सस्नेह आवाहन!*
(श्री. विकास शांताराम विसपुते हे 'सकल भारतीय सोनार समाज संघटन' आणि 'सकल ओबीसी सेतुबंधन' चे सहसंस्थापक, 'सकल भारतीय सोनार समाज समुपदेशन समिती सहसमन्वयक', 'सकल ओबीसी समाज समुपदेशन समिती सहसमन्वयक' तसेच 'विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन समितीचे सहसमन्वयक' म्हणून कार्यरत आहेत.)
*--प्रस्तुती :*
आपलाच एक सामान्य सोनार समाजबांधव,
मिलिंदकुमार सोनार
नाशिक रोड,
संस्थापक, *सकल भारतीय सोनार समाज संघटन*
संस्थापक, *सकल ओबीसी सेतुबंधन.*
