पंढरपूर प्रतिनिधी
पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मा.श्री. जयंत आसगावकर सर आणि सौ.हर्षदाताई देशमुख-जाधव यांच्या प्रचारार्थ सोलापूर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहिलो.
या मेळाव्याला ज्येष्ठ नेते आदरणीय आमदार जयंतराव पाटील , आमदार सतेज पाटील , खासदार धैर्यशीलभैय्या मोहिते-पाटील, खासदार प्रणितीताई शिंदे आणि आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा संपन्न झाला.
शिक्षक मतदारसंघात जयंत आसगावकर सरांनी केलेले कार्य आणि पदवीधर मतदारसंघात हर्षदाताई देशमुख-जाधव यांचे अभ्यासपूर्ण नेतृत्व ही महाविकास आघाडीची जमेची बाजू आहे. या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने एकजुटीने काम करावे, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावे आणि महाविकास आघाडीची भूमिका प्रभावीपणे मांडावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.
ही लढाई केवळ दोन उमेदवारांची नसून, शिक्षकांच्या सन्मानाची, पदवीधरांच्या हक्कांची आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याची आहे. यावेळी ज्येष्ठ नेते ॲड. रामहरी रुपनवर, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, येलगुरवार सर, रामलिंग शटगार, संदीप साठे, महेश गादेकर, चेतन नरोटे, वसंतनाना देशमुख, रवींद्र पाटील, साहेबराव भुसे, प्रकाश सोनवणे, पल्लवी पाटील, विनंती कुलकर्णी, सागर पडगळ, अरुण तोडकर, अमरसिंह खांडेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


