उन्नी येथे वैयक्तिक अन्नत्याग आंदोलन त्यानंतर शेतकऱ्यांन सह साखळी उपोषण
अहमदपूर : (राम रत्नपारखे लातूर जिल्हा प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या शासनाने तातडीने मान्य कराव्यात, या मागणीसाठी अहमदपूर तालुक्यातील उन्नी येथे १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता एक दिवसीय वैयक्तिक अन्नत्याग उपोषण करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या सहभागातून सामूहिक साखळी उपोषण सुरू करण्याचा इशारा श्यामसुंदर गोविंदराव गंगथड़े यांनी दिला आहे.
याबाबत तहसीलदार, अहमदपूर यांना निवेदन देण्यात आले असुन दुष्काळ, पीकविमा, शेतमालाचे दर, कर्जबाजारीपणा तसेच दिव्यांग शेतकऱ्यांच्या कृषी सुविधांसह विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :
1. सन २०२५ मधील पीकविमा भरलेल्या पात्र शेतकऱ्यांना घोषित ₹१७,५०० पीकविमा रक्कम तत्काळ अदा करावी.
2. सन २०२६ च्या दुष्काळी परिस्थितीत कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५० हजार, तर बागायती शेतकऱ्यांना हेक्टरी ₹१ लाख मदत द्यावी.
3. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन जनावरांसाठी आवश्यक ठिकाणी चारा छावण्या तात्काळ सुरू कराव्यात.
4. दिव्यांग शेतकऱ्यांना कृषी उपकरणे १०० टक्के अनुदानावर, उपलब्ध करून द्यावीत. तसेच दुग्ध व्यवसायासाठीही ₹१.५० लाखांपर्यंत अनुदान द्यावे.
5. सर्व प्रमुख पिकांच्या पीकविमा हप्त्यात ५० टक्के वाढ करावी.
6. कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज तात्काळ उपलब्ध करून द्यावे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹२ लाख प्रोत्साहनपर अनुदान द्यावे.
7. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, बचत गट व इतर कर्जदारांचे कर्जहप्ते स्थगित करून त्यांच्या CIBIL स्कोअरवर प्रतिकूल परिणाम होऊ नये, यासाठी उपाययोजना कराव्यात.
8. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ₹१,००० अनुदान द्यावे.
9. शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा उपलब्ध करून द्यावा. जुन्या पीकविमा प्रकरणांतील सर्व त्रुटी तातडीने दूर करून विमा भरपाई अदा करावी.
10. अहमदपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल ₹३,५०० व अंतिम दर ₹४,००० प्रति टन मिळावा.
शासनाने वरील सर्व बाबी लक्ष्यात घाव्यात व दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून शासनाने मागण्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, लातूर जिल्ह्यात पीकविमा आणि दुष्काळी मदतीच्या मागण्यांबाबत शेतकरी आंदोलनांचा दबाव वाढत असल्याचे अलीकडील वृत्तांतूनही दिसून येत आहे.
#अहमदपूर #शेतकरीआंदोलन #उपोषण #पीकविमा #दुष्काळ #शेतकरीमागण्या #लातूर #अहमदपूरतालुका #कर्जमाफी #ऊसदर #मराठवाडाLiveNews
