जयकुमार गोरेंच्या अध्यक्षतेखाली सोलापुरात बैठक
सोलापूर प्रतिनिधी
आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी भाजपने तयारीला वेग दिला आहे. सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीचे नियोजन, संघटनात्मक काम आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याबाबत चर्चा करण्यात आली.
126sRT-aEDAglm8a2w/s1600/1005983187.jpg"/>
भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव, तर शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
*शिक्षक मतदारसंघात महायुतीतील मतभेद चर्चेत*
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेचे मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीसमोर पेच निर्माण झाला होता. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत मंगेश चिवटे यांनी माघार घेतली. त्यामुळे महायुतीकडून कौस्तुभ गावडे हे उमेदवार राहिले. दुसरीकडे, अपक्ष उमेदवार सचिन सानप यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने या मतदारसंघातील निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
*मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन*
शिक्षक आणि पदवीधर मतदारांचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा आणि स्थानिक पातळीवरील अडचणी जाणून घेऊन त्यांच्याशी थेट संपर्क साधण्याची रणनीती बैठकीत मांडण्यात आली. प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, तसेच निवडणुकीच्या कामाला गती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील संघटनात्मक यंत्रणा सक्रिय करून पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी समन्वय साधण्यावर भाजपने भर दिला.
पुणे शिक्षक-पदवीधर उमेदवार निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी.
byविनोद पोतदार
•

