पंढरपूर प्रतिनिधी - राजेंद्र फुगारे नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष यांच्या
वाढदिवसानिमित्त ४१ रक्तदात्यांनी केले रक्तदान पंढरपूर तालुक्यातील कोंढारकी या
गावामध्ये नेहरूयुवा मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तादान शिबिर
कार्यक्रमाच्या उद्घाटन मोहोळ मतदार संघाचे आमदार राजू खरे यांच्या सुविद्य पत्नी
तृप्तीताई खरे यांनी केले.
याप्रसंगी त्या म्हणाल्या की ग्रामीण भागातून अशा
प्रकारचे रक्त संकलन करणे ही काळाची गरज आहे आणि हेच गरज ओळखून गेले कित्येक वर्षे
कोंढारकी येतील राजेंद्र फुगारे नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष यांच्या वाढदिवसाचे
औचित्य साधून प्रत्येक वर्षी या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते हे काम
निश्चित कौतुकापद व ग्रामीण भागातील लोकांना प्रेरणादायक आहे. अशा प्रकारचे प्रेरणा
घेऊन ग्रामीण भागातील युवकांनी काम करावे असे त्यांनी आवाहन केले तसेच याच वेळी
त्यांनी कोंढारकीतील अंगणवाडीस भेट दिली व शिवांशी फुगारे यांच्या वाढदिवसानिमित्त
सर्व चिमुकल्यांना खाऊ वाटप व वृक्षारोपण ही करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी
,महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे मा. कोषाध्यक्ष गोरख भिलारेसर, तसेच
नेहरू युवा मंडळाचे राहुल नागणे ,विनोद पाटील ,उमेश दांडगे, विश्वनाथ पाटील,
पाटबंधारे विभागाचे अधिकारी सोमनाथ देशमुख ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील
व नेहरू युवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रम
प्रसंगी रक्तदात्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

