खंडाळी गावास लवकरच मिळणार तीर्थक्षेत्र दर्जा- पालकमंत्री जयकुमार गोरे

विकास पाटील यांच्या प्रयत्नाला यश,वै.ह.भ.प. दादासाहेब पाटील स्मरणार्थ सूरू होतेय गुरुकुल
मोहोळ प्रतिनिधी -- मोहोळ तालुक्यातील खंडाळी गावात सुरू असलेल्या भगवान श्रीविठ्ठल पादुका पालखी सोहळा व जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज वाडमयीन विचार चिंतन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.जयकुमार गोरे हे आले होते. यावेळी कार्यक्रमाचे नियोजक व भगवान विठ्ठल पादुका सोहळ्याचे विकास पाटील यांनी खालील विषय मंत्री महोदय यांच्या समोर मांडले होते. यामध्ये विषय क्र १) संत एकनाथ, संत माणकोजी बोधले यांनी खंडाळी गावांचा त्यांच्या ग्रंथात केलेला उल्लेख व यानुसार गावातील वारकरी संप्रदायाचे महत्व सांगितले २) खट्वांग राजाची माहिती व खंडाळी गावाचा आलेला नाम उल्लेख ३) शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला अखंड हरिनाम सप्ताह व त्याचे स्वरूप आणि महत्त्व ४) पंढरपूर येथील गुरुपौर्णिमेला होणारा भगवान विठ्ठलाचा गोपाळकाला झाला कि पहिला गोपाळकाला करण्याचा मान या गावास परंपरेनुसार आलेला आहे व हे वारकरी संप्रदायातील सर्व फडकरी परंपरा व अनेक महाराज मंडळींनाही ज्ञात व मान्य आहे. ५) खंडाळी गावातील भारतीय शास्त्रीय संगीताचे उपासक,संगीत शिक्षक,माजी पोलीस पाटील तसेच वारकरी संप्रदायचे सेवक वै..ह.भ.प.पं.दादासाहेब पाटील यांच्या स्मरणार्थ गावात आध्यात्मिक,सांगीतिक व सांस्कृतिक विषयाचे शिक्षण देणारे गुरूकुल सुरू करायचे आहे. ६) श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर चे सर्व आध्यात्मिक कार्य व वै.ह.भ.प.पं.दादासाहेब पाटील यांच्या स्मरणार्थ सुरू केले जाणारे गुरूकुलचे व यासाठीचे सर्व कार्याचा विकास करण्यासाठी खंडाळी गावास तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा व यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. वरिल विषयांची माहिती दिल्यानंतर या मागणीस उत्तर देताना महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.जयकुमार गोरे साहेबांनी श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर चे सर्व आध्यात्मिक कार्य व वै.ह.भ.प.पं.दादासाहेब पाटील यांच्या स्मरणार्थ सुरू केले जाणारे गुरूकुलचे व यासाठीचे सर्व कार्याचा विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्र दर्जा जाहिर केला. यामध्ये १) श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर चे सर्व आध्यात्मिक कार्यासाठी मंदिर उभारणी,यात्रा निवास व परिसर विकासक २) वै.ह.भ.प.पं.दादासाहेब पाटील यांच्या स्मरणार्थ सुरू केले जाणारे गुरूकुल त्यांची इमारत,शिक्षण व इतर आवश्यक खर्च व यासाठीचे सर्व कार्याचा विकास या दोन्ही विषयांसाठी पाच कोटींची मदत जाहिर केली तसेच यात आणखी निधीची गरज लागली तर वाढीव निधी देण्यात येईल असे जाहिर केले. वै.ह.भ.प.पं.दादासाहेब पाटील यांचे सुरू केले जाणारे गुरूकुलचा प्रस्ताव कलापिनी संगीत शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष श्री विकास पाटील यांनी मंत्री महोदय यांना दिला. यावेळी लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील, विठ्ठल मंदिर सार्वजनिक ट्रस्ट चे विश्वस्त लक्ष्मण मुळे,उत्तम मुळे,अर्जून मुळे,लहू श्रीखंडे, सागर कूंभार, पंचायत समिती सदस्य गणेश मुळे, माजी सरपंच नेताजी मुळे, औदुंबर मुळे तसेच विठ्ठल भजनी मंडळ चे सर्व युवा सदस्य तसेच मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते. विकास पाटील यांनी केलेल्या निरंतर मागणीला यश आले आहे. यामुळेच समस्त ग्रामस्थांमध्ये एक आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form