मातोश्री लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या निधनानिमित्त सांत्वनपर भेट

लातूर औसा -- पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीचे सहअध्यक्ष तथा आपल्या सर्वांचे परम आदरणीय मार्गदर्शक ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर आणि "नाथ संस्थान" चे प्रमुख ह.भ.प. गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या पूजनीय मातोश्री श्रीमती लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांचे काही दिवसांपूर्वीच वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
या अत्यंत कठीण आणि वेदनादायी प्रसंगी औसेकर महाराज व त्यांच्या संपूर्ण परिवाराचे सांत्वन करण्यासाठी आज औसा (जि. लातूर) येथील त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली.या भेटीदरम्यान, परमपूज्य आईसाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अत्यंत विनम्रतेने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. मातोश्रींच्या जाण्याने औसेकर परिवारासह संपूर्ण वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रसंगी आदरणीय गहिनीनाथ महाराज औसेकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली व त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.आईसाहेबांचे वात्सल्य आणि त्यांचे संस्कार हेच औसेकर महाराज यांच्या महान कार्याची मोठी प्रेरणा होते. ईश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या चरणी स्थान देवो आणि औसेकर परिवाराला या अथांग दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना! नगरसेवक डी राज सर्वगोड, भाई नितीन काळे युवा भीमसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री पंकज काटे, सुभाष काटे व अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form