*कुटुंबामध्ये वृद्धांचे स्थान अनन्यसाधारण असून, त्यांच्यामुळे घराला घरपण येते. कारण, त्यांचा कुटुंबाला, फार मोठा आधार असतो. घरातील नातवंडांचे, आजी-आजोबांचे रेशीम बंध जुळलेले असतात*
कारण ती छोटी मुले आजी-आजोबांवर जीवापाड प्रेम करतात. आणि त्यांनाही नातवंडांचा, खूप लळा असतो. म्हणून त्यांचे नाते काही वेगळ्याच रंगाचे असते, त्यामुळे घर हसर खेळकर दिसते. कुटुंबात वृद्धांचे स्थान हे त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांवर, अवलंबून असते .त्यांनी त्यांचे स्थान दृढ करण्यासाठी, प्रवाह नुसार पावले टाकण्याची गरज असते, तसे न केल्यास नवीन पिढीला त्यांचा त्रास होतो. मात्र प्रत्येक वेळेस माझेच खरे, अशा विचारांचा पगडा त्यांच्या मनावर असेल तर, संघर्ष निर्माण होतो. वृद्धांनी जर त्यांचा दृष्टिकोन बदलला नाही तर, सकारात्मक परिवर्तन केले नाही तर, घरात कलह निर्माण होतो. व कुटुंब, उध्वस्त व्हायला वेळ लागत नाही.
*जी काही माणसांची मानसिकता असते ते माणूस जन्मताच घेऊन येतो. ते त्याने पुढे स्वतः बदलली पाहिजे. मानसिकताही, कायद्याने बदलता येत नाही, यासाठी तुम्हीच आनंदाने राहा, मुलांच्या संसारात फार लक्ष घालू नका, त्यांनाही त्यांच्या संसाराचा आनंद लुटू द्या, त्यामुळे सर्वच सुखी होतील.*
*दाटून आलेल्या सायंकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं, तसेच काहीसे पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात, प्रेम येतं, हे जितकं खरं, तितक्याच आयुष्यात येणाऱ्या संध्या छाया ही खऱ्या, आणि अपरिहार्य मानवी आयुष्यात तारुण्याचा बहर येतो, तसाच वार्धक्याचा शिशिर, ही येतो, फक्त या शशिराचा स्वीकार करण्याची एक सकारात्मक मानसिकता मात्र घडवावी लागते.*
मुख्य म्हणजे आपल्या आयुष्यातील अखेरची इनिंग आपण अधिकाधिक सार्थ कशी बनवतो, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.
नोकरीनिमित्त मुले परदेशात गेली तर, या ज्येष्ठ मंडळींनी आपल्या मुलांना, आणि त्यांच्या जीवनशैलीला सकारात्मक परिणाम दिले आहे. अवास्तव अपेक्षा नाहीत सारखे *मुलांच्या संसारात डोकावणे नाही, आणि मुले आम्हाला सोडून तिकडे गेली, हे पालुपदही नाही आपल्या आवडीच्या कामात, छंदात मन गुंतवले तर आयुष्याची संध्याकाळ सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही.*
✒️
*श्री रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी. ता. फलटण. जि. सातारा. फोन. ९९७०७४९१७७*
