दि. 01 ते 15 जुलै या कालावधीत सकाळी 05.00 वाजेपासून ते रात्री 10.00 वाजेपर्यंत व दि. 15 जुलै नंतर 29 जुलै पर्यंत 24 तास
पंढरपूर, (दि 02):- आषाढी शुद्ध एकादशीला पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात यात्रा
भरते. आषाढी यात्रा सोहळयासाठी सुमारे 12 ते 15 लाख भाविक पंढरपूरला येतात.
भाविकांची सुरक्षितता व यात्रा सुकर होणेचे दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन अधिनयम 2005
मधील कलम 34 (ब) नुसार मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात
आल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एस.
कार्तीकेयन यांनी पारित केला असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
यांनी दिली . पंढरपूर शहरातील श्रीकृष्ण मंदीर, चौफाळा ते श्री विठ्ठल रूक्मिणी
मंदिर पश्चिमद्वार, मंदीर परीसर ते महाद्वार चौक परीसर दि. 01 ते 15 जुलै या
कालावधीत सकाळी 05.00 वाजेपासून ते रात्री 10.00 वाजेपर्यंत व दि. 15 जुलै नंतर 29
जुलै पर्यंत 24 तास सदर परीसर वाहन प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आला आहे.
आषाढी यात्रा कालावधीत शहरात येणा-या भाविकांची संख्या पाहता, श्रीकृष्ण मंदीर,
चौफाळा श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पश्चिमद्वार, मंदीर परीसर, महाद्वार चौक परीसर
या भागात भाविकांची संख्या मोठया प्रमाणात असते. तसेच या भागातून भाविक
दर्शनरांगेकडे व मंदिराकडे पायी चालत जात असतात. अशावेळी ब-याच ठिकाणी प्रदक्षिणा
मार्गावर, जागोजागी दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंग केलेले असतात, यामुळे
भाविकांना रस्त्यावरून ये-जा करण्यास अडचण निर्माण होते. येणा-या दुचाकी,
चारचाकीमुळे अपघाताची जास्त शक्यता व रस्त्यावर गर्दी वाढून रहदारीच्या समस्या
निर्माण होतात. यामुळे गर्दी व्यवस्थापनाकरीता प्रशासनास अडचणी निर्माण होतात. शहर
व परीसरातील वाहतूक व दर्शनरांग सुरळीतपणे चालणेसाठी व यात्रा कालावधीत शांतता व
सुरक्षितता राहावी, यासाठी वाहन प्रतिबंधक आदेश पारीत करण्यात आले आहेत. श्रीकृष्ण
मंदीर, चौफाळा ते श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पश्चिम द्वार, मंदीर परीसर, महाद्वार
चौक परीसरात दुचाकी, चारचाकी व इतर सर्व वाहने चालवण्यास व लावण्यास (पार्कीग) मनाई
करण्यात आली आहे.तसेच मंदीर परीसरातील छोटया छोटया अरूंद रस्त्यावर वाहने लावण्यास
मनाई करण्यात आली आहे.शासकीय सेवा, अत्यावश्यक सेवा, मंदीर परीसरात राहणारे,
मंदीरात कामकाज करणारे व्यक्तींचे वाहनांसाठी पोलीस प्रशासनाकडून पास प्राप्त
झालेनंतर सदरच्या आदेशातून सूट राहील. तथापि, शासकीय कर्तव्य, मंदीरातील कर्तव्य
याशिवाय इतर बाबीसाठी शासकीय व मंदीर समितीचे वाहन, कर्मचारी वाहन याचा वापर केला
जाणार नाही, अन्यथा कडक कारवाई केली जाईल. या कालावधीमध्ये येणा-या भाविकांच्या
वाहनाची पार्कीग व्यवस्था पंढरपूर नगर परीषदेमार्फत करणेत यावी. मंदीर परीसरात
राहणारे, कामकाज करणारे व्यक्तींकरीता वारी कालावधीसाठी पोलीस प्रशासनाकडून पास
घ्यावेत. पासधारकांना वैयक्तीक कारणासाठी मुभा राहणार नाही, वाहन पास धारकांनी
ठरवून दिलेल्या जागेतच वाहन पाकींग करावे. मंदीर परिसरात व्यवसाय करणारे
व्यावसायिकांच्या मालाची ने-आण करणेसाठी पोलीस प्रशासनाशी चर्चा करुन भाविकांची
गैरसोय होणार नाही, अशी ठराविक वेळ निश्चीत करुन त्यादरम्यान वाहतूक होईल, याची
दक्षता घ्यावी. महत्वाचे तसेच राजशिष्टाचार पात्र व्यक्तींसाठी तसेच दिव्यांग
व्यक्तीसाठी श्री. विठ्ठल रुक्मीणी मंदीरे समीतीने श्रीकृष्ण मंदीर, चौफाळयापासून
ने-आण करणेकामी पर्यावरणपूरक वाहनांची व्यवस्था करावी. आदेशाची अंमलबजावणी
काटेकोरपणे होणेचे दृष्टीने वाहन प्रतिबंध क्षेत्रामध्ये अनाधिकृतपणे वावरणाऱ्या
वाहनावर शहर पोलीस निरीक्षकांनी जप्तीची कारवाई करुन सदर वाहने पोलीस स्टेशन
पंढरपूर येथे दंडात्मक कारवाईसाठी जमा करण्यात यावी. तसेच सदर वाहनावर मोटार वाहन
कायदा 1988 मधील तरतुदीनुसार मोठ्या रक्कमेचा दंडात्मक कारवाई अनुसरण्यात यावी.
दंडात्मक कारवाईची संपूर्ण रक्कम वसूल झाल्याशिवाय सदरील वाहन कार्यमुक्त करण्यात
येवू नये सदरच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम
2005 अन्वये तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 223 अन्वये कारवाईस पात्र
राहिल. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 000000000
