*. सोनार बांधवांसाठी सुवर्णसंधी! | व्यवसायासाठी मिळणार 1 लाख रुपये बिनव्याजी कर्ज | ऑनलाईन अर्ज सुरू

* *सोलापूर सोनार समाज संस्थेचे महत्त्वाचे आवाहन!*
*आजच्या काळात लोकसंख्या वाढली असली तरी नोकरीच्या संधी मात्र कमी झाल्या आहेत. त्यामुळे सुशिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. व्यवसाय करायचा म्हटला तर भांडवलाची मोठी अडचण येते.* *हीच अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत 'थेट कर्ज योजना' राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत छोट्या व्यावसायिकांना 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.* *सोनार समाज बांधवांसाठी ही योजना 'संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळा' मार्फत राबवली जाते. इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.* *अर्ज कुठे कराल?* *www.msobcfdc.org* या वेबसाईटवर जाऊन उप-कंपनीच्या पोर्टलवर अर्ज करायचा आहे.( संत नरहरी आर्थिक विकास महामंडळ ) *अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:* 1. शाळा सोडल्याचा दाखला 2. जातीचा दाखला 3. तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला - वार्षिक 1 लाख रुपयांपर्यंत 4. अधिवास प्रमाणपत्र - Domicile 5. रेशन कार्ड 6. आधार कार्ड व पॅन कार्ड 7. व्यवसायासाठी लागणाऱ्या साहित्याचे दरपत्रक - Quotation 8. बँक पासबुक झेरॉक्स 9. व्यवसायाच्या जागेचा पुरावा 10. शॉप ॲक्ट लायसन्स 11. सिबिल स्कोअर - किमान 500 आवश्यक *महत्त्वाची सूचना:* ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अर्जाची एक प्रत व सर्व मूळ कागदपत्रे घेऊन कार्यालयात पडताळणीसाठी जाणे बंधनकारक आहे. *अधिक माहितीसाठी संपर्क:* *महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ मर्या.* *पत्ता:* डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तिसरा मजला, सात रस्ता, सोलापूर *दूरध्वनी:* 0217-2312595 *मोबाईल:* 7744997556 *सोनार समाज संस्थेने आवाहन केले आहे की, सर्व पात्र सोनार बांधवांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा व स्वावलंबी व्हावे.*

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form