**दोन्ही भगिनींवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव* *
नाशिकरोड (प्रतिनिधी)* :
नाशिकरोडयेथील कु. अवंतिका अमोल वडनेरे ही बारावी विज्ञान शाखेत ९१.१७%, पीसीएम सीईटी (ए
ग्रुप) परीक्षेत ९२.३८%, व पीसीबी सीईटी (बी ग्रुप) परीक्षेत ९३.५०% गुण मिळवून
यशस्वी झाली. तिने दहावीच्या परीक्षेत ९६% गुण प्राप्त केले होते. नाशिक महापालिका
प्रभाग क्रमांक १७ च्या नगरसेविका सौ. प्रमिलाताई कैलास मैंद यांनी घरी जाऊन तिची
अभिनंदन केले. अवंतिकाची लहान बहीण कु. आराध्या अमोल वडनेरे हिने महाराष्ट्र राज्य
परीक्षा परिषद, पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळवून
शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे. तिने इयत्ता पाचवीतसुद्धा ती शिष्यवृत्तीस पात्र ठरली
होती. या शैक्षणिक यशसातत्यामुळे कु. अवंतिका व कु. आराध्या यांच्यावर यांचे
शैक्षणिक तसेच सामाजिक वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत कु. अवंतिका आणि कु.
आराध्या या दोन्ही भगिनींचे तसेच त्यांचे वडील श्री. अमोल नंदकुमारशेट वडनेरे आणि
आई सौ. कल्पनाताई अमोलशेट वडनेरे यांचे सकल भारतीय सोनार समाज संघटनचे संस्थापक
मिलिंदकुमार सोनार, सहसंस्थापक सर्वश्री शांताराम गोपाळशेट दुसाने (नाशिकरोड),
श्री. विकास शांताराम विसपुते (पुणे), प्राचार्य श्री. किरण रघुनाथ दुसाने (यावल,
जि. जळगाव) यांनी अभिनंदन केले आहे. श्री. अमोल नंदकुमारशेट वडनेरे हे सक्रिय
सामाजिक कार्यकर्ते असून, अनेकांच्या सुखदुःखात धावून जातात. गरजवंतांना वैद्यकीय
मदत करतात. नाशिक येथील हरिओम वधु वर परिचय मेळावा समिती, न्यू हरिओम सेवाभावी
संस्था, नासिकरोड - देवळाली सुवर्णकार समाजाचे २५ वर्षांपासून सदस्य, औषधवितरण
क्षेत्रात महाराष्ट्र राज्य रिजनल मॅनेजर पदावर १० वर्षे कार्यरत होते. सध्या ते
नाशिक येथील सह्याद्री रुग्णालयात कार्डिओलॉजिस्ट डॉ. प्रशांत पवार यांचे जनसंपर्क
अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कार्डिओलॉजिस्ट सह्याद्री हॉस्पिटल, नाशिक येथे
कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी सौ. कल्पनाताई अमोलशेट वडनेरे या नाशिकरोड महिला
मंडळाच्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. कु. अवंतिका आणि कु. आराध्या यांनी प्राप्त
केलेले यश आणि त्यांनी दाखवून दिलेले शैक्षणिक यशसातत्य हे शालेय तसेच
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे. कु. अवंतिका आणि कु. आराध्या या
दोन्ही भगिनींचे तसेच त्यांचे पालक श्री. अमोल नंदकुमारशेट वडनेरे आणि आई सौ.
कल्पनाताई अमोलशेट वडनेरे यांचे सकल भारतीय सोनार समाज संघटन, सकल ओबीसी सेतुबंधन,
युनिव्हर्सल विश्वकर्मा वंशज फाउंडेशन इंटरनॅशनल, वंशावळी डॉट कॉम (पुणे), अखिल
भारतीय अहिर सुवर्णकार मध्यवर्ती मंडळ, नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाज, अहिर
सुवर्णकार संस्था (नाशिक), ऋग्वेद सुवर्ण वार्ता यूट्यूब प्रसार वाहिनी, (नागपूर),
मासिक सुवर्णालंकार, (नागपूर), मासिक सुवर्णकुंभ (अहमदाबाद), मासिक स्वर्णकार सेतु,
अखिल माळवी सोनार महासंघ, अखिल वैश्य सोनार महासंघ, अखिल देशस्थ दैवज्ञ सोनार
संस्था महाराष्ट्र प्रांतिक मंडळ, दैवज्ञ सोनार महासंघ महाराष्ट्र राज्य, अकोला,
तसेच दैवज्ञ सोनार महासंघ शी संलग्नित सर्व दैवज्ञ सोनार समाज संस्था, एकविचार -
एकमंच प्रतिष्ठान (छत्रपती संभाजी नगर), अखिल झाडे सोनार महासंघ, विश्वकर्मा पंचाल
सुवर्णकार समाज महासंघ, महाराष्ट्र राज्य पंचाल सोनार महामंडळ, भारतीय सुवर्णकार
समाज संस्था (नागपूर), महाराष्ट्र प्रदेश, सोनार समाज संस्था (सोलापूर), सोनार एकता
फाऊंडेशन (कोल्हापूर), अखिल भारतीय मैढ क्षत्रिय स्वर्णकार समाज, महाराष्ट्र प्रदेश
मैढ क्षत्रिय स्वर्णकार समाज, अजमीढ देव जनकल्याण संस्था (मुंबई), मुंबई प्रदेश मैढ
क्षत्रिय सोनार समाज, भारतीय नरहरी सेना, पंढरपूर, जिल्हा सोलापूर, अखिल भारतीय लाड
सुवर्णकार समाज सुवर्ण विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण सोनार संघटना, श्री संत
नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक),
स्वर्ण कला सोसाइटि उत्तर प्रदेश, (प्रयागराज), तसेच *सेतुबंधन* मधील विविध सोनार
संस्था आणि संघटना यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.
