जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे ५ वे राष्ट्रीय अधिवेशन पंढरपूरात

पंढरपूर प्रतिनिधी -- रविवार दिनांक २८ जून २०२६ रोजी जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे ५ वे राष्ट्रीय अधिवेशन पंढरपूर येथे होणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती याप्रसंगी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांनी दिली. जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन ही संघटना वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी कार्यरत असून, "मानव सेवा हीच ईश्वर सेवा" या ध्येयाने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे.गेल्या पाच वर्षांमध्ये संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत अनेक प्रश्नांवर आवाज उठवून जनतेच्या न्याय हक्कांसाठी भरीव कार्य केले आहे. संघटनेचे राष्ट्रीय, राज्य, विभागीय, जिल्हा, तालुका व शहर स्तरावरील पदाधिकारी, सदस्य, पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते मानवाधिकार क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून संघटनेचे जाळे अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांनी कल्याण कुलकर्णी यांची सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. तसेच पंढरपूर तालुकाध्यक्षपदी बालम मुलाणी आणि शहराध्यक्षपदी दत्ताजी पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच पश्चिम महाराष्ट्र सल्लागारपदी ॲड. सादिक शेख यांची फेर निवड करण्यात आली. यावेळी पंढरपूर तालुका आणि शहर नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मानवाधिकार चळवळीला अधिक बळकटी देत समाजातील वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांच्या न्याय व अधिकारासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प करण्यात आला. संघटना आगामी काळात विविध सामाजिक, जनजागृती व मानवाधिकार संरक्षणाशी संबंधित उपक्रम राबविणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form