* *ऍड. दिलीप ठाकूर यांनी नांदेड शहरात पंतप्रधानांच्या संकल्पनेतून "फिट इंडिया" धोरण राबविले*

*नांदेड प्रतिनिधी - उज्ज्वला गुरसुडकर* *सुदृढ भारताच्या निर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘फिट इंडिया’च्या संकल्पनेला बळ देत भाजपच्या योग सप्ताहानिमित्त धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या २७ व्या भव्य चालण्याच्या स्पर्धेचे उद्घाटन माजी पालकमंत्री डी. पी. सावंत व महापौर कविता मुळे यांच्या हस्ते तिरंगा झेंडा दाखवून करण्यात आले. या स्पर्धेत तब्बल ३२२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवत भरघोस प्रतिसाद दिला. विविध 11 गटातील विजेत्यांना स्नेहलता जायसवाल यांच्यातर्फे मोबाईल व विजयसिंह परदेशी यांच्यातर्फे आकर्षक स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली.* श्रीराम सेतू पुल, गोवर्धन घाट, नांदेड येथे भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मचारी नेते रामेश्वर वाघमारे हे होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय जनसंघाचे संस्थापक व महान राष्ट्रभक्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला लंगर साहिब गुरुद्वाराचे बाबा सुबेकसिंहजी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी महापौर कविता मुळे, भाजप जिल्हा सरचिटणीस सुषमा थोरात, उपाध्यक्षा शततारका पांढरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ॲड. दिलीप ठाकूर यांच्या गेल्या २७ वर्षांपासून सुरू असलेल्या निस्वार्थ सामाजिक कार्याचे व नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. तसेच ३ व १७ जुलै रोजी नांदेडहून प्रस्थान करणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी सर्व यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेतील विविध ११ गटांमध्ये साईप्रसाद हळदे, रणजीत धर्मापुरीकर, आनंद सोनटक्के, प्रशांत होट्टे,मेघा पाठक, गंगामणी गिरगावकर, गीता जोशी, यादव तल्लामडगे, मंगला निलेवार, के.जी. काळे, पूर्वा ब्राह्मणकर या विजेत्यांना स्नेहलता जायसवाल यांच्यातर्फे मोबाईल फोन तर विजयसिंह परदेशी यांच्यातर्फे आकर्षक स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली.अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत अशोक दलपे, नामदेव पांचाळ, साईप्रसाद देवकते, छाया चौधरी, बी. एन. पाटील, मंगला पांचाळ, सुरेखा घोगरे, वैष्णवी ब्राह्मणकर, डॉ. पंकज मणियार, शीला भालेराव व गुलाब मार्तंड यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. तर रमेश चित्ते, किशोर वागदरीकर, नारायण चव्हाण, गंगाधर मुंगल, प्रकाश कोमटवार, कांचन इंगोले, भाग्यश्री पांचाळ, विमल पाटील, धनंजय नलबलवार, रोहिणी महाकाळकर व जयश्री उन्हाळे, प्रथमेश ताटे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेच्या विविध गटांना वाहतूक निरीक्षक अजय साकळे, कमल कोठारी, नामदेव पतंगे, रामकृष्ण चक्रवार, शिवा लोट, शिवाजी शिंदे आणि संजय चौधरी यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. स्नेहलता जायसवाल, मंगल कार्यालय व टेंट असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष विजयसिंह परदेसी, सुरेश लोट, राजेश केंद्रे, चंचल सिंग जट,ॲड.चिरंजीलाल दागडिया, जयश्री ठाकूर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. संपूर्ण स्पर्धेचे रंगतदार व प्रभावी सूत्रसंचालन सुभाष देवकत्ते यांनी केले. राजेश केंद्रे, गणेशसिंह परमार, गंगाधर पिठलेवार व संतोष बच्चेवार यांनी पंच म्हणून चोख कामगिरी बजावली.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी राजेशसिंह ठाकूर, धरमसिंह परदेशी, जगतसिंह ठाकूर, प्रभुदास वाडेकर, कैलास महाराज वैष्णव, महेंद्र शिंदे, राहुल ठाकूर, सचिन बनसोडे,शिवचरण लोट, गोपाल भारती यांनी विशेष परिश्रम घेतले.गेल्या २७ वर्षांपासून नागरिकांना नियमित चालण्याची सवय लागावी, आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि निरोगी समाज घडावा या उद्देशाने ॲड. दिलीप ठाकूर सातत्याने या स्पर्धेचे आयोजन करीत असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form