खर्डीतील ठिय्या आंदोलन मागे सर्व मागण्या मान्य..

पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील खाजगी सिताराम साखर कारखान्याच्या गेट समोरील तरुण शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन अखेर चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले. सोमवारपासून विविध मागण्यांसंदर्भात सुरू असणारे हे आंदोलन राज्यभर चर्चेला आले होते. कारखान्यातून होणारे हवा,पाणी,भूमी प्रदूषण अशा अनेक समस्यांच्या तक्रारीबाबत तरुण शेतकरी यांनी गेट समोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते.ते आज गुरुवार रोजी सायंकाळी पाच वाजता मागे घेण्यात आले असल्याची माहिती तरुणांनी दिली.यावेळी गजानन घाडगे,अनिल अगावणे,राजू पुंडेकर, आप्पासाहेब घाडगे,विष्णू सुळे,काशिलिंग खताळ यांच्याशी चर्चा करून कारखान्याच्या सर्वेसर्वा राजलक्ष्मी गायकवाड यांनी अधिकृतरित्या लेखी निवेदन दिले यावेळी युटोपीयन शुगरचे मालक उमेश परिचारक,तालुक्याचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर उपस्थितीत होते. तपकिरी शेटफळ, खर्डी भागातील अनेक शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कारखान्याच्या हंगाम काळात तसेच इतरही वेळेस सांडपाणी,बग्यास व दुर्गंधी या समस्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक त्रस्त होते.लवकरच यावर तोडगा काढणार असल्याचे कारखाना विभागाकडून सांगण्यात आले.लोकशाही मार्गाने आंदोलन झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी तहसीलदार सचिन लंगोटे व सर्व प्रशासन अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. फोटो ओळी:-आंदोलन कर्त्यांच्या मागण्या लेखी स्वरूपात पूर्तता करणारे पत्र देताना राजलक्ष्मी गायकवाड, शेजारी उमेश परिचारक, निरीक्षक टी वाय मुजावर..व ग्रामस्थ.. (छाया:-कटाक्ष फोटो.)

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form