*उपविजेताचा मान डिजिटल मीडिया संघाने पटकविला; सेवालय फाउंडेशनचे मनीष काळजे यांचा विशेष सन्मान*
सोलापूर : सोलापुरातील पत्रकार बांधवांसाठी रेल्वे मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या 'लोकनाथ' मीडिया क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तरुण भारत संवाद संघाने प्रथम तर् डिजिटल मीडिया संघाने द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकाविले.
मागील तीन दिवसांपासून सेवालय फाउंडेशन, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ व डिजिटल मीडिया असोसिएशन यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या स्पर्धेचा समारोप रविवारी सायंकाळी झाला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभास माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश साठे, ॲड. धनंजय माने, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चंद्रकांत रेम्बर्सु, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, रयत शेतकरी संघटनेचे नामदेव पवार, आरटीओचे संदीप शिंदे, सुयश खानापुरे, अमोल झाडके, राजाभाऊ आलुरे, चित्रकार ऋत्विक चव्हाण, सेवालय फाउंडेशनचे प्रमुख मनीष काळजे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, डिजिटल मीडिया असोसिएशनचे विजयकुमार बाबर,विजकुमार देशपांडे,दिगंबर इप्पलपल्ली, सागर सुरवसे व आफ्ताब शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पहिला उपांत्यपूर्व सामना डिजिटल मीडिया विरुद्ध लोकमत हे दोन्ही संघात झाला. हा सामना डिजिटल मीडिया संघाने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या उपांत्यपूर्व फेरी सामन्यात तरुण भारत संवाद संघाने राज्य मराठी पत्रकार संघाला पराभूत केले. डिजिटल मीडिया संघ व तरुण भारत संवाद संघ यांच्यात झाली. प्रथम फलंदाजी करताना डिजिटल मीडिया संघाने 78 धावा केल्या होत्या, त्यांनी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना अटीतटीच्या सामन्यात तरुण भारत संवाद संघाने 82 धावा करत विजय संपादन केला. बक्षीस वितरण कार्यक्रमादरम्यान सर्व संघाचे खेळाडू व सोलापुरातील क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेला पंच म्हणून प्रसिद्ध डांसिंग पंच सोन्याबापू भोसले, स्वप्नील इंगळे व मोहसीन मुल्ला यांनी काम पाहिले तर समालोचक शंकर पवार, गुण नोंदक म्हणून साईराज पवार व सूत्रसंचालन म्हणून श्वेता हुल्ले यांनी काम पाहिले.
------------------
*चौकट*
👇🏻
*सामनावीर ठरला इब्राहिम मुजावर*
*या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबाबत तसेच मालिकावीर,उत्कृष्ट फलंदाज- गोलंदाज इब्राहिम मुजावर यांना विशेष गौरवण्यात आले. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अतुल फराटे यांना सन्मानचिन्ह देत सन्मानित करण्यात आले.*
----------------------
*यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत तसेच मंगेश चिवटे यांनी व्हिडिओ कॉल द्वारे खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.*

