पंढरपूर प्रतिनिधी-
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारातून प्रेरणा घेवून प्रत्येक
मुलाला शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे व तो विद्यार्थी घेत असलेल्या शिक्षणाला
अडथळा न येण्यासाठी गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी पंढरपूर येथील सारथी फाऊंडेशन
यांच्यावतीने शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये वही, पेन, पट्टी याचे
ज्ञानप्रबोधनी विद्यालय येथे वाटप करण्यात आले. सदरचा उपक्रम गेल्या 5 वर्षापासून
सारथी फाऊंडेशन यांच्यावतीने राबविण्यात येत असतो. सारथी फाऊंडेशनचे संस्थापक
सतीश आप्पा माने यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी वही, पेन, पट्टी याचे
वाटप करून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यापूर्वी माढा तालुक्यात
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप याच
संस्थेकडून करण्यात आले होते. त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना दिवाळी कालावधीत
टी शर्टचे वाटप देखील करण्यात येते. दत्तात्रय महाराज काळे यांच्या अध्यक्षतेखाली
सदरचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संस्थापक सतीश आप्पा माने, उपाध्यक्ष सागर
कदम, सचिव गणेश थिटे, सहसचिव नवनाथ बाबर, खजिनदार धनंजय थिटे, शेखर भोसले, तात्या
जगताप, विकी झेंड, विठ्ठल भुमकर, सागर संत, संतोष काटकर, माऊली कुलकर्णी, श्रीराम
साळुंखे, धैर्यशील माने, आदित्य काळे,गुरूदेव माने,ऋतुराज पवार तसेच
ज्ञानप्रबोधनी विद्यालयातील मुख्याध्यापक पोरे सर, शिवाजी जाधव सर, अवघडे सर,
यांच्यासह इतर सर्व शिक्षक उपस्थित होते.
