पंढरपूर प्रतिनिधी --
समाजाप्रती नेहमीच दायित्व दाखविणार्या रोहन परिचारक यांचा
वाढदिवस कर्मयोगी इन्स्टिटयूट मद्धे रक्तदाना चा संकल्प करून साजरा करण्यात आला.
"रक्तदान हेच श्रेष्ठ दान" असा संदेश त्यांनी युवकांना देऊन सर्वांना रक्तदानासाठी
प्रेरित केले. यावेळी रोहन परिचारक यांनी वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून
समाजोपयोगी कार्य करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी कर्मयोगी
इन्स्टिट्यूटच्या परिसरात आयोजित रक्तदान उपक्रमात विद्यार्थ्यांनी व कर्मचारी
वर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यामध्ये कर्मयोगी अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक,
फार्मसी, नर्सिंग, ज्युनियर कॉलेज इ. संस्थांच्या सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यानी
रक्तदान केले. यामधे सुमारे २३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. महाविद्यालयाच्या
राष्ट्रीय सेवा योजना विभागच्या वतीने रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या
सर्व कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप
प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चे प्रा.
गुरुराज कुलकर्णी तसेच कर्मयोगी शैक्षणिक समूहातील डिग्री इंजिनियरिंग,
पॉलिटेक्निक, नर्सिंग, फार्मसी, ज्युनिअर कॉलेज या सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य,
अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर उपक्रमासाठी पंढरपूर ब्लड बँक व श्री स्वामी समर्थ ब्लड बँक यांचे विशेष
सहकार्य लाभले. रक्तदान केल्यानंतर रक्तदात्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली
होती. सदर चा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना
विभागाचे विभाग प्रमुख प्रा. गणेश बागल यांनी विशेष परिश्रम घेतले.
