*पंढरपूर सिंहगड मधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात सिव्हिलाईझ २के२६ कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न*

पंढरपूर (प्रतिनिधी) – सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागा तर्फे आयोजित सिव्हिलाईझ २के२६ हा कार्यक्रम दिनांक २८ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात टेक्निकल क्विझ, गेमिंग झोन, ब्रिकबॉन्ड आणि ग्रुप डिस्कशन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विविध महाविद्यालयांमधील ३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्ये सादर केली. स्पर्धांतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. यशवंत पवार, डीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट डॉ. चेतन पिसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे आणि उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “सिव्हिलाईझ २के२६ हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी टीमवर्क, नवकल्पना आणि तांत्रिक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ ठरला आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून नेतृत्वगुण आणि स्पर्धात्मक वृत्ती वाढीस लागते.” कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डीसी कन्स्ट्रक्शन, कर्वे डेव्हलपर्स, बडीज कॅफे, सासवडे रिअल इस्टेट आणि सिंहगड झेरॉक्स यांनी स्पॉन्सरशिपद्वारे महत्त्वपूर्ण सहकार्य केले. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. शेखर पाटील यांनी जबाबदारीने काम पार पाडले. सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन (सेसा) आणि आय. जी. एस. स्टुडंट चॅप्टर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यार्थी समन्वयक पूजा घायाळ, स्नेहा कदम, पृथ्वीराज सावंत आणि राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सक्रिय सहभागामुळे ‘सिव्हिलाईझ २के२६’ हा कार्यक्रम यशस्वीरीत्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form