*सकल विश्वकर्मीय समाज, लातूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला जाहीर सत्कार सोहळा

लातूर प्रतिनिधी- राम रत्नपारखी-- *सकल विश्वकर्मीय समाज, लातूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला जाहीर सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.* या सोहळ्यात पोलीस उपनिरीक्षक (PSI) श्री. योगेश गोविंद पांचाळ तसेच जिल्हा परिषद सदस्य श्री. ओंकार पांचाळ होनाळीकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थित. मान्यवरांनी त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. अभयजी सोळुंके (जिल्हाध्यक्ष, लातूर ग्रामीण काँग्रेस) व मा. श्री. किरणजी जाधव (स्वीकृत नगरसेवक, महानगरपालिका लातूर) उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून समाजातील युवकांनी विविध क्षेत्रात प्रगती करावी, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भास्कर विश्वकर्मा हे लाभले होते. हा कार्यक्रम श्री विश्वकर्मा मंदिर, बार्शी रोड, लातूर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन सुदर्शन बोराडे (राज्य संपर्क प्रमुख), भागवत पांचाळ (जिल्हाध्यक्ष), अनंत पांचाळ (व्ही. व्ही. एस. जिल्हाध्यक्ष), पांचाळ युवा जिल्हाध्यक्ष सौरभ सुतार (कार्याध्यक्ष), ह. भ. प. भरत पांचाळ कवठाळीकर (जिल्हा संपर्कप्रमुख, लातूर) तसेच अहमदपूर तालुका अध्यक्ष बालाजी पांचाळ, हरिभाऊ पांचाळ, डॉ. बालाजी पांचाळ तालुका कार्याध्यक्ष औसा, दिगंबर पांचाळ माजी सरपंच, भरत पांचाळ कल्पना शिंदे लातूरवेलनेसकोचलातूर उद्योजक यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form