*कराड च्या भूमीत सोलापूर च्या सुपुत्रांचा गौरव*.

*कारीकर, मंद्रूपकर, आष्टीकर, पोतदार समाजरत्न पुरस्काराचे मानकरी*.
सोलापूर प्रतिनिधी - कराड येथील प्रतिष्ठित स्व. दिगंबर काशिनाथ पालकर प्रतिष्ठान च्या वतीने दिला जाणारा यंदाचा मानाचा समाज रत्न पुरस्कार संत नरहरी मंदिर समितीचे माजी अध्यक्ष तथा विध्यमान विश्वस्त श्री. भारत कारीकर, उपाध्यक्ष श्री. मोहन मंद्रूपकर, कार्यवाहक श्री संजय आष्टीकर आणि सोनार समाज संस्था सोलापूर चे अध्यक्ष वसंत पोतदार यांना जाहीर झाला आहे. धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात या मान्यवरांनी केलेल्या निष्कलंक, निरपेक्ष, उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठान ने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. श्री. भारत कारीकर यांनी त्यांच्या कार्यकाळात श्री. संत नरहरी महाराज समाधी मंदिर पंढरपूर ची अनेक विकास कामे मार्गी लावली असून, उपाध्यक्ष श्री. मोहन मंद्रूपकर व श्री. संजय आष्टीकर यांनी मंदिर व्यवस्थापन आणि भाविकांच्या सोयीसाठी मोठे योगदान दिले आहे. तसेच श्री. वसंत पोतदार यांनी सोनार समाज संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचून केलेले कार्य आदर्शवत आहे. कराडच्या भूमीत सोलापूर च्या या चारही सुपुत्रांचा गौरव होत असल्याबद्दल संपूर्ण सोनार समाजात आणि सामाजिक वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. या निवडीबद्दल समाजात सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. याशिवाय गोविंदराव थोरात आण्णा नडशी, रवींद्र बर्डे काका कासेगाव, दादासाहेब डोर्ले, व सौ. शुभांगी डोर्ले सातारा, सौ विनिता धर्माधिकारी पुणे, व मकरंद नाईक कराड यांना समाज भूषण, व श्री सूर्यकांत बारसकर चेन्नई, दादासाहेब सुतार कराड यांना चित्रमहर्षी आणि चंद्रकांत जाधव यांना वृक्ष मित्र आदी मान्यवर यंदाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. हा पुरस्कार प्रदान सोहळा दिनांक 18 मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता श्री. कृष्णाबाई मंगल कार्यालय ( नवीन ) सोमवार पेठ कराड येथे, कृष्णा विश्व विद्यापीठ कराडचे कुलपती तथा य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना लि. शिवनगरचे अध्यक्ष मा. श्री. सुरेशराव भोसले ( बाबा ) साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, कृष्णा खोरे विकास महामंडळा चे माजी उपाध्यक्ष मा. श्री . आनंदराव पाटील ( नाना ), पुणेचे ग्रामीण साहित्यिक मा. श्री. ब. ल. पोतदार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form