*सोलापूर च्या शिरपेचात मानाचा तुरा : भारत कारीकर यांच्यासह चौघाना कराड चा 'समाजरत्न ' पुरस्कार प्रदान!*

पंढरपूर प्रतिनिधी -- कराड येथील नामवंत दिगंबर काशिनाथ पालकर प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात येणारा मानाचा *समाजरत्न* पुरस्कार यावर्षी सोलापूरच्या चार समाज सेवकांना प्रदान करून गौरविण्यात आले.सोलापूर सोनार समाज संस्थेचे अध्यक्ष श्री. वसंत पोतदार, संत नरहरी समाधी मंदिर पंढरपूर चे माजी अध्यक्ष तथा विध्यमान जेष्ठ विश्वस्त श्री. भारतराव करीकर, उपाध्यक्ष श्री. मोहनराव मंद्रूपकर आणि कार्यवाहक श्री संजयजी आष्टीकर यांना त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल हा सन्मान देऊन गौरविण्यात आले.. कराड येथे दि. 18 एप्रिल रोजी एका दिमाखदार सोहळ्यात व्यासपीठावरील मान्यवरांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सोलापूर च्या या चारही मान्यवरांचे कौतुक करताना प्रतिष्ठान च्या वतीने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
कृतज्ञता व्यक्त करताना श्री. वसंत पोतदार म्हणाले की, हा पुरस्कार केवळ आमचा सत्कार नसून, समाजाप्रती असलेल्या आमच्या जबाबदारीची ही मोठी पावती आहे. पालकर प्रतिष्ठानने केलेल्या या गौरवामुळे भविष्यात अधिक जोमाने समाज कार्य करण्याची प्रेरणा आम्हांला मिळाली आहे.या पुरस्कार सोहळ्याबद्दल संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून समाज बांधवाकडून चौघाचेही अभिनंदन होत आहे. या गौरव सोहळ्यासाठी सोलापूर हुन सोनार समाज संस्थेचे अग्रणी प्रवर्तक तथा श्री. कालिका पत संस्थेचे तज्ञ् संचालक श्री. संजयजी मैदर्गीकर, श्री. कालिका नागरी पत संस्थेचे चेअरमन श्री. अमोल दीक्षित, व्हॉइस चेअरमन श्री. प्रकाश तपासे आणि लोकल ऑडिटर श्री. प्रकाश कांबळे यांनी आवर्जून उपस्थित राहून पुरस्कार्थिंचा उत्साह वाढवला. या पुरस्कार सोहळ्याबद्दल संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून समाज बांधवाकडून चौघाचेही अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form