*धुळे शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी सौ. लताताई यशवंत पोतदार यांची निवड*

*विविध सोनार समाज संस्था आणि संघटना यांच्यातर्फे अभिनंदनाचा वर्षाव*
नाशिक प्रतिनिधी :(राम रत्नपारखी) धुळे शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती म्हणून सोनार समाज भगिनी नगरसेविका सौ. लताताई यशवंत पोतदार यांची निवड झाली असून, त्या सोमवार दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी स्थायी समिती सभापती पदाचा कार्यभार हाती घेणार आहेत. सौ. लताताई यशवंत पोतदार या धुळे शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी विराजमान होणाऱ्या प्रथम सोनार समाजभगिनी आहेत. नूतन स्थायी समिती सभापती सौ. लताताई यशवंत पोतदार या युवा फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच प्रख्यात कंत्राटदार श्री. दिनेश यशवंत पोतदार यांच्या मातोश्री आहे. सोमवार दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता स्थायी समिती सभापती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महानगरपालिका आवारातील संत नरहरी महाराज स्मारक येथे संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणार आहेत. त्यानंतर शहरातून भव्य रॅली काढण्यात येणार असून, या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी धुळे महानगरातील अधिकाधिक सोनार समाज बांधव आणि भगिनी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. धुळे शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सौ. लताताई यशवंत पोतदार यांचे धुळे महानगरातील विविध सोनार समाज संस्था आणि संघटना, सकल भारतीय सोनार समाज संघटन, सकल ओबीसी सेतुबंधन,युनिव्हर्सल विश्वकर्मा वंशज फाउंडेशन इंटरनॅशनल, वंशावळी डॉट कॉम पुणे, ऋग्वेद सुवर्ण वार्ता यूट्यूब प्रसार वाहिनी नागपूर, अखिल माळवी सोनार महासंघ, अखिल वैश्य सोनार संघ, अखिल देशस्थ दैवज्ञ सोनार संस्था महाराष्ट्र प्रांतिक मंडळ, दैवज्ञ सोनार महासंघ महाराष्ट्र राज्य अकोला, दैवज्ञ सोनार महासंघशी संलग्नित सर्व दैवज्ञ सोनार संस्था, दैवज्ञ सेवाभावी संस्था, नांदेड, एकविचार - एकमंच प्रतिष्ठान, छत्रपती संभाजी नगर, अखिल झाडे सोनार महासंघ, विश्वकर्मा पंचाल सुवर्णकार समाज महासंघ, अखिल भारतीय अहिर सुवर्णकार मध्यवर्ती मंडळ, अहिर सुवर्णकार समाज संस्था नाशिक, श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक), भारतीय नरहरी सेना, पंढरपूर, जिल्हा सोलापूर, अखिल भारतीय लाड सुवर्णकार समाज सुवर्ण विद्यापीठ, भारतीय सुवर्णकार समाज संस्था (नागपूर), महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य ग्रामीण सोनार संघटना, सोनार समाज संस्था सोलापूर, सोनार एकता फाऊंडेशन कोल्हापूर, अजमीढ देव जनकल्याण संस्था मुंबई, मुंबई प्रदेश मैढ क्षत्रिय सोनार समाज, स्वर्णकार सेतु, महाराष्ट्र प्रदेश मैढ क्षत्रिय स्वर्णकार समाज, स्वर्ण कला सोसाइटि प्रयागराज उत्तर प्रदेश तसेच सेतुबंधनमधील विविध सोनार संस्था आणि संघटना यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले असून, भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form