मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना पत्रकार संतोष रणदिवे

पंढरपूर प्रतिनिधी विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान जयंती महोत्सव समिती पंढरपूर यांच्यावतीने पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दै.तरुण भारत संवादचे पत्रकार संतोष रणदिवे यांना विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर युवा पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. पत्रकार संतोष रणदिवे हे दैनिक तरुण भारत संवाद या वृत्तपत्रात पंढरपूर प्रतिनिधी म्हणून ९ वर्षापासून कार्यरत आहेत. शेतकरी,वंचित,शोषित व पीडित लोकांवरील झालेल्या अन्यायाला लेखणीतून वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे.यापूर्वी त्यांना कोविड योद्धा, समता गौरव,युवा पत्रकार,आषाढी यात्रा उत्कृष्ट वार्तांकन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सदर पुरस्कार सोहळ्याचे वितरण विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक (शिवतीर्थ) येथे संपन्न झाले. यावेळी माजी मंञी लक्ष्मणराव ढोबळे, मंदिर समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, नगराध्यक्षा डॉ.पप्रणिता भालके, सभापती डॉ.शुभम आगावणे, मनसे नेते दिलीप धोञे,चेअरमन अनिल सावंत,प्रचार्य बी.पी.रोंगे, जयंती समितीचे संस्थापक अध्यक्ष डी.राज सर्वगोड, अध्यक्ष श्रीकांत चंदनशिवे आदी मान्यवरांची उपस्थितीती होती.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form