पंढरपूर प्रतिनिधी
कवठेकर प्रशाला, पंढरपूर येथे काही दिवसांपूर्वीच आमचे बालमित्र,
प्रशालेचे माजी विद्यार्थी, मुंबई हायकोर्टचे प्रथितयश वकील श्री. सारंग आराध्ये
यांनी AI डिजिटल बोर्ड भेट दिला होता. त्या AI बोर्डच्या माध्यमातून प्रत्यक्ष
वर्गात कसे शिकविले जाते याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमवेत बसून पाहण्याचा आज
योग आला. तसेच एका माजी विद्यार्थ्यांच्या अनोख्या भेटीचा स्विकार करून AI बोर्डची
स्मार्ट एन्ट्री – कवठेकर प्रशालेत करून शिक्षणाला आधुनिक स्पर्श देण्यासाठी
सहकार्य केल्याबद्दल कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक गुरुवर्य श्री. व्ही. वाय.
पाटील सर, उपमुख्याध्यापिका सौ. कुलकर्णी मॅडम व श्री. गडदे सर यांचे व संस्थेचे
अध्यक्ष श्री. नानामालक कवठेकर, मानद सचिव श्री. सुधीर पटवर्धन व सर्व सदस्यांचेही
मनापासून आभार...! आज सुमारे 32-33 वर्षांनी वर्गात बाकावर बसून 35 मिनिटांचा
सायन्सचा तास अनुभवला... आणि क्षणभर शाळेच्या दिवसात मन रमले... "परीक्षा नाही
घेतल्या तर अजूनही आपण वर्गात बसू शकतो.." असा लास्ट बेंचरप्रमाणे विचार काही क्षण
चमकून गेला. " कवठेकर प्रशालेचे श्री. मोहोळकर सर यांनी अतिशय उत्तम पद्धतीने AI
बोर्डवर शास्त्रशुद्ध तास घेतला.. खूप छान वाटलं. या नवीन युगातील
तंत्रज्ञानाद्वारे दिली जाणारी शिक्षणपद्धती विद्यार्थी व शिक्षकानी लवकरच आत्मसात
केली याचे खूप कौतुक वाटले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण अधिक प्रभावी
व्हावे हाच उद्देश AI डिजिटल बोर्ड देण्यामागे आमचे मित्र सारंग आराध्ये यांचा
होता. या उपक्रमामुळे शाळेच्या शैक्षणिक प्रगतीस मोठी चालना मिळणार आहे. AI बोर्ड
बनविलेल्या "टिचमिंट" कंपनीने भारतातील बऱ्याच IIT, IIM, व नामांकित शैक्षणिक
संस्थेत आपले बोर्ड दिले आहेत आता त्या यादीत पंढरपूरच्या "कवठेकर प्रशालेसारख्या"
मराठी माध्यमाच्या शाळेचे नाव सामाविष्ट झाले याचा खूप आनंद झाला. "शालेय जीवन
संपल्यावर पोटार्थी म्हणून जगात प्रवेश केल्यावरही आपण आपल्या शाळेचे, समाजाचे
काहीतरी देणे लागतो..." अशा प्रकारचे मौलिक संस्कार ज्या शाळेने केले त्या शाळेच्या
प्रगतीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने आपले योगदान द्यावे ही या मागची प्रामाणिक
भावना व या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची नवी दारे खुली
झाली असून भविष्यातही अशा उपक्रमांची गरज आहे अशी माजी विद्यार्थ्यांकडून
अपेक्षा...
*"दान दिल्याने ज्ञान वाढते .. त्या ज्ञानाचे मंदिर हे....* *सत्य
शिवाहून सुंदर हे.."* *मंदार केसकर* (माजी विद्यार्थी, कवठेकर प्रशाला, पंढरपूर)

