ॲग्रो कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक; पोलिसात तक्रार

पंढरपुर प्रतिनिधी - पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील ॲग्रो कंपनीकडून भोसे येथील शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी शेतकरी कृष्णात बोंगे यांनी पत्रकार परिषदेत केली. पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील ॲग्रो कंपनीचे अनवर शेख व ग्रामीण बैंक या दोघांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेमध्ये कृष्णात बोंगे यांनी केली आहे भोसे ॲग्रो कंपनीने वैनगंगा कृष्णा ग्रामीण बैंकेच्या वतीने शेतकऱ्यांना १ लाख ४० हजार रुपयाचे प्रकरण केले मात्र प्रत्यक्षात शेतक-यांना ७० हजार देण्यात आले सदर रक्कमेची फेडण्यासाठी भोसे ॲग्रो कंपनीला दूध देण्यास सांगितले व त्याचे बिल कर्जापोटी जमा करुन घेण्यात आली. मात्र प्रभात कंपनीने घेतलेले दुधाचे पैसे बँकेत भरलेच नाहीत. तसे दुसरा हप्ता शेतकऱ्यांना दिला नाही.तसेच शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा विश्वास न देता त्रास देण्याचा कर्मचारी कंपनीचे अधिकारी यांनी काम केले आहे आम्हा शेतकऱ्यांचे सिबिल स्कोर खराब झाला असून कोणतेही बँक, पतसंस्था, बचत गट,आम्हास कर्ज देण्यास तयार नाही. ॲग्रो कंपनी व वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँकेने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. यामुळे या मनमानी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.याबाबत पोलीसात तक्रार दाखल केली आहे परंतु पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form