स्त्री अर्थात नारी... म्हणजे कर्त्यव्य. स्त्री म्हणजे वास्तव्य. स्त्री म्हणजे
मातृत्व. स्त्री म्हणजे मांगल्य. भारतीय संस्कृतीत आदर्श असे नारीचे
सहनशीलतेचे..त्यागाचे व समर्पणाचे प्रतीक मानले जाते. भारतीय संस्कृती मध्ये
स्त्रीला सन्मान गॊरव आणि मातृत्व शक्तीचे प्रतीक ही मानले जाते हीच तिची खरी ओळख
हेच तिचे अस्तित्व. कुटूंबात नारी शक्तीला सदैव नेतृत्वाचे स्थान दिलेले आहे.
भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ मानली जाते कारण याचे अंतरंग म्हणजे ऐकते चे
भाव...सर्व जाती धर्म भाषा आणि रीती रिवाज यांचा सन्मान केला जातो जे एक वैशिष्ठ
समजावे लागेल. ज्ञान विज्ञान योग कला संस्कृतीचे भांडार म्हणजे आपली संस्कृती होय.
सारांश भारतीय संस्कृती व या संस्कृतीचे जतन व पालन करणारी स्त्री समाजाचा आधार
आहे.विषेश म्हणजे ईश्वराने दिलेला एक सूंदर उपहार आहे. आई बहीण मुलगी पत्नी या
नात्याची भूमिका पार पाडणारी स्त्री अर्थात नारी जगात श्रेष्ठ आहे. जागतिक महिला
दिनानिमित्त सर्व माता भगिनि यांना हार्दिक शुभेच्छा🌹
