पंढरपूर :- तालुक्यातील नारायण चिंचोली येथे सत्यनारायण देव कालवा पाणी वापर
संस्थेची उन्हाळा हंगाम पूर्व आढावा बैठक संपन्न झाली . या बैठकीच्या अध्यक्षांनी
सत्यनारायण देव कालवा पाणी वापर संस्थेचे चेअरमन चंद्रकांत कदम होते. तर या बैठकीस
प्रमुख मार्गदर्शन म्हणून पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण धनवडे
मोलाचे मार्गदर्शन केले. भीमा कालवा अंतर्गत येणाऱ्या रोपळे शाखा क्रमांक 12
अंतर्गत नारायण चिंचोली येथील सत्यनारायणदेव कालवा पाणी वापर संस्था गेल्या काही
वर्षापासून कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून येथील शेतकरी सभासदांना खरीप
रब्बी उन्हाळी हंगामामध्ये नियमित पाणीपुरवठा करणे ची भूमिका संस्थेने पारदर्शक पार
पाडली आहे . शनिवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये संस्थेच्या वतीने नियमित पाणीपट्टी
भरणे व पाणी मागणी अर्ज भरणे असे प्रमुख विषयाचे ठराव पारित करण्यात आले. यावेळी
प्रमुख मार्गदर्शक म्हणून धनवडे यांनी सर्व सभासद शेतकऱ्यांनी सर्वच हंगामामध्ये
मोठ्या प्रमाणात रीतसर पाणी मागणी अर्ज करण्याची गरज असल्याचे सांगितले यामुळे
परिसरात मोठ्या प्रमाणात शेतजमिनी मध्ये पाणी मुरल्याने परिसरातील विहीर व बोर
यांची पाण्याची पातळी वाढून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले
.त्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून भीमा कालवा विभागाकडे सर्वच
हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी मागणी करून पाणी पट्टी ही वेळेत भरणे गरजेचे
असल्याचे आवर्जून सांगितले . या बैठकी वेळेस भीमा कालवा विभागाचे रोपळे शाखा
अधिकारी पी.टी.माने सचिव मारुती लवंड संस्थेचे संचालक जनार्दन कंदारे,अरुण वाघ ,
मारुती वाघमोडे,ज्ञानेश्वर बर्डे ,पोपट पाटील,मोहन वाघमोडे ज्ञानेश्वर मस्के,
नारायण देशमुख, आप्पासाहेब वाघमोडे विष्णू माने, तानाजी माने , आदी मान्यवर शेतकरी
सभासद उपस्थित होते.
