पंढरपूर तालुक्याच्या विकासासाठी निधीचा वर्षाव; राज्य अर्थसंकल्पात कोट्यवधींच्या कामांना मंजुरी

रिंग रोड, नवीन पूल आणि रस्त्यांच्या कामांना भरघोस निधी- मा.आ.प्रशांत परिचारक
पंढरपूर (प्रतिनिधी) : राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प पंढरपूर तालुक्यासाठी विकासाची गंगा घेऊन आला आहे. यामध्ये विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्ते व पुलांच्या या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता, अशी माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पामध्ये रिंग रोड आणि उड्डाणपूलांसाठी मोठा निधी जाहीर करण्यात आला आहे. प्रशांत परिचारक हे मागील अनेक वर्षापासून रिंग रोड व उड्डाणपुलासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. या मागणीची दखल घेत पंढरपूर शहराच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वाखरी-टाकळी-अनवली-मुंढेवडी-अजनसोंड-देगांव या रिंग रोडसाठी तब्बल २७८ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे शहराबाहेरून अवजड वाहतूक जाण्यास मदत होऊन भाविकांची आणि स्थानिक नागरिकांची सोय होणार आहे. याशिवाय शहरांतर्गत वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठाकरे चौक पंढरपूर ते टाकळी रोड रूंदीकरणासह उड्डाणपुलासाठी ५० कोटी १६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भीमा नदीवर होणार दोन नवीन पूल तालुक्यातील दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी भीमा नदीवर दोन महत्त्वाचे पूल उभारले जाणार आहेत. यात मुंढेवाडी-अजनसोंड रस्त्यावर भीमा नदीवर नवीन पुलासाठी ३२ कोटी ५० लाख आणि शहरातील जुन्या दगडी पुलाशेजारी दुसरा समांतर पूल उभारण्यासाठी ४५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामुळे वारी कालावधीत आणि दैनंदिन कामकाजात होणारी गर्दी कमी होण्यास मोठी मदत होईल. ग्रामीण रस्त्यांच्या कामांना गती केवळ शहरच नाही तर ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळेही या निधीतून मजबूत होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने: गुंजेगाव-तनाळी-कासेगाव ते पंढरपूर प्रजिमा 168 मध्ये सुधारणा करणे. ३१ कोटी ५० लाख रुपये गोपाळपूर-रांझणी-ओझेवाडी रा.मा. 392 मध्ये सुधारणा करणे. ३८ कोटी रुपये बोहाळी ते खर्डी रा.मा. 391 मध्ये सुधारणा करणे 1 कोटी 50 लाख रूपये खर्डी ते तपकिरी शेटफळ प्रजिता 111 मध्ये सुधारणा करणे. 1 कोटी 50 लाख रूपये उंबरगाव ते सोनके रस्ता प्रजिमा 85 मध्ये सुधारणा करणे 2 कोटी रूपये रांझणी ते सरकोली रस्ता सुधारण करणे 6 कोटी रूपये पंढरपूर ठाकरे चौक ते टाकळी रोड रूंदीकरणास उड्डाणपुल बांधणे 50 कोटी 16 लाख रूपये भटुंबरे-पखालपूर ते मेंढापूर ओ.डी.आर 100 मध्ये रूंदीकरण व सुधारणा करणे. 20 कोटी 50 पन्नास लाख रूपये श्री.संत तुकाराम महाराज पालखी मार्ग पिराचीकुरोली प्रजिमा 81 मध्ये सुधारणा करणे 25 कोटी पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून वाखरी ते पंढरपूर या अंदाजे ८ कि.मी. रस्ता चौपदरीकरण व रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने 'खासबाब' म्हणून १२० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या कामामुळे पंढरपूर शहरात प्रवेश करताना होणारी वाहतूक कोंडी कायमची दूर होणार आहे. या कामांमुळे तालुक्याच्या दळणवळण व्यवस्थेला नवी दिशा मिळेल. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले व पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांचे आम्ही ऋणी आहोत." तालुक्याच्या विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प असल्याच्या भावना व्यक्त होत असून, एवढा मोठा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संपूर्ण पंढरपूर शहर व तालुक्यातील जनतेच्या वतीने सरकारचे आभार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form