महिला दिनानिमित्त विशेष
ओ. बी. सी हक्कासाठी लढणाऱ्या, ओ. बी. सी. समाजाच्या न्याय हक्कासाठी दिल्ली च्या राजकीय पटलावर सक्रिय पणे आवाज उठवणाऱ्या आणि ओ बी सी हक्क परिषद दिल्लीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, जन नायक कर्पूरी ठाकूर ओ बी सी संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि भारतीय पांचाळ संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा या विविध पदावर कार्यरत असणाऱ्या डॉ. सौं. माधवीताई पोतदार यांना जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. यांचा . त्यांच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्याची दखल घेत हा विशेष लेख.
डॉ. सौं. माधवी पोतदार या केवळ एक पदाधिकारी नाहीत तर त्या ओ. बी. सी. समाजाच्या सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या एक तळमळीच्या नेत्या आहेत.दिल्लीस्थित ओ. बी. सी.हक्क परिषद या राष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून त्या मागास, इतर मागास वर्गीयावर होणाऱ्या अन्याया विरुद्ध आवाज उठवितात.महिलांच्या समश्या, त्यांचे हक्क आणि समाजात त्यांना मिळणारे स्थान याबद्दल त्या नेहमीच आग्रही राहिल्या आहेत. महाराष्ट्रात, सोलापुरात संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. प्रत्येक्ष मैदानात उतरून समाजाचे प्रश्न सोडविण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक युवती आणि महिलाना प्रेरणा मिळाली आहे..
सोलापूर येथे डॉ.सौं माधवी पोतदार या नावाने आज समाजात प्रेरणादायी नेतृत्वाची एक नवी ओळख निर्माण त्यांनी केली आहे. कष्ट, सेवा आणि निःस्वार्थ वृत्तीच्या आधारे त्यांनी आपल्या सोनार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीत आहेत.
समाजातील सर्व घटकाशी एकात्म भाव ठेऊन त्यांनी समाजाच्या प्रत्येक घराघरात आदर मिळवीला आहे. कोणताही भेद भाव न करता सर्वाना समान न्याय व सुविधा देण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला आहे. समाजातील एकजुटीला बळकटी देत एक नवी ओळख मिळवून दिली आहे.त्यांच्या नेतृत्वामुळे समाजात प्रगतीचे नवे मार्ग खुले झाले आहेत. निस्वार्थी सेवा भावी कार्यामुळे जनतेच्या मनात त्यांना विशेष स्थान आहे. सामाजिक बांधिलकी, निःस्वार्थ सेवा आणि जनतेशी सतत संपर्क ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणून सौं. माधवीताई पोतदार यांचे नांव सोलापुरात आदराने घेतले जाते. निराधार, गरजवंत, आणि वंचित घटकाच्या समश्या सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला असून समाजातील प्रत्येक घटकासाठी कामे करण्याची त्यांची वृत्ती खरोखरच प्रेरणादायी ठरली आहे. डॉ.सौं. माधवीताई पोतदार या समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावण बाळ आदी योजनेचा लाभ अनेक कुटुंबाना मिळवून देण्याचे योगदान दिले आहे.महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सक्षमीकरणासाठी त्यांची भूमिका उल्लेखनीय आहे. महिलावरील अन्याय, अत्याचार आणि सामाजिक प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी त्या नेहमीच पुढे असतात. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना व्यावसायिक प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या कार्य शैलीत नेहमीच जनतेचा विश्वास, जनतेसाठी प्रयत्न हा मुलमंत्र दिसून येतो. सामाजिक क्षेत्रात त्यांनी राबविलेले अनेक उपक्रम सोलापुर च्या नागरिकांसाठी आदर्श ठरल्या आहेत. सतत समाजाच्या, जनतेच्या संपर्कात राहून प्रत्येक समश्यांचा तोडगा शोधाण्यास आणि सर्वाना न्याय मिळवून देण्यात त्यांचा प्रयत्न कायम असल्यामुळे आज डॉ.सौं माधवीताई पोतदार यां नावाने सोलापूर च्या जनतेच्या मनात विश्वास आणि आदर निर्माण झाला आहे.
त्यांचे कार्य असेच अविरत चालू राहो आणि सोनार तसेच इतर सर्व ओ. बी. सी. समाजाला त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक न्याय मिळो ही सदिच्छा!.
त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो अशी सदिच्छा. त्यांच्या सामाजिक कार्यास शुभेच्छा.
*वसंत पोतदार सोलापूर*
