उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाकळीकरांना दिलेला शब्द पाळला**शिवसेना संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या मागणीला यश**

अर्थसंकल्पात पंढरपूर विकास आराखड्यासह पंढरपूर ते टाकळी उड्डाणपूलासह रस्त्याला ५० कोटी १६ लाखांची तरतूद
पंढरपूर प्रतिनिधी-- पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे चौक ते टाकळी चौक या रस्त्याचा समावेश करावा अशी मागणी आषाढी यात्रेदरम्यान महापूजेसाठी आलेले तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे यांनी केली होती. त्यावेळी टाकळी येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाकळीकरांना दिलेला शब्द पाळा असून अर्थसंकल्पात पंढरपूर विकास आराखड्याला गती देण्यात आली असून पंढरपूर ते टाकळी उड्डाणपूलसह रस्त्याला ५० कोटी १६ लाख रुपये निधीची तरतूद केल्याने शिवसेना संपर्कप्रमुख महेश साठे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले. याप्रसंगी बोलताना महेश साठे म्हणाले की शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी इतिहासात प्रथमच टाकळी ग्रामपंचायतीला मोठा निधी दिला आहे. यामध्ये टाकळी पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आली असून, एक हजार बेडचे शासकीय रुग्णालय, टाकळी नगरपंचायत होण्याचा मार्ग लवकरच पूर्णत्वास येणार असल्याचे सांगितले. यावेळी महेश साठे यांनी शिवसेना कामातून उत्तर देते असे सांगत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. याप्रसंगी टाकळी गावचे माजी सरपंच संजय साठे, रोहन बचुटे, बालाजी बागल, धनंजय पाटील, सारंग महामनी, पांडुरंग शिंदे, प्रदीप भोसले, इंगवले सर, मारुती माने, भारत म्हात्रे, निंबाळे, बापू डोंगरे, विशाल माने, दादा कदम, आकाश कदम, जयकुमार सपकाळ उपस्थित होते. दरम्यान अर्थसंकल्पात टाकळी उड्डाणपूल्यास रस्त्याला निधी देण्याची घोषणा झाल्यानंतर टाकळी ग्रामस्थांनी महेश साठे यांच्या निवासस्थानी एकत्र येऊन साठे यांचे आभार मानत पेढे वाटून जल्लोष साजरा केला. दक्षिण काशी पंढरी नगरीत श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी देशभरातील भाविक मोठ्या संख्येने दाखल होत असतात येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इतिहासात प्रथमच पंढरपूरच्या वारी अगोदर पाहणी दौरा करून भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन एक वेगळा पायंडा घालून दिला आहे. राज्यातील पहिली शिवसेनेची ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाकळी ग्रामपंचायतीला महेश साठे यांच्या माध्यमातून इतिहासात प्रथमच सर्वात मोठा निधी मिळाल्याने लवकरच गावचा कायापालट होणार असल्याने टाकळीकर नागरिकांकडून शिवसेनेचे आभार मानले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form