श्री कालिका मंदिर परिसरातील अडथळा ठरणारे विद्युत खांब हटवले

सोलापूर प्रतिनिधी -- प्रभाग क्र. ०८ मधील श्री विश्वब्राह्मण समाज कालिका सेवा मंडळ ट्रस्टचे श्री कालिका देवी मंदिर परिसरात असलेल्या श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या ६८ लिंगांपैकी ४३ वे लिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री अचलेश्वर लिंग येथे श्री विश्व ब्राह्मण समाज कालिका सेवा मंडळ ट्रस्टच्या मालकीच्या व मानाच्या चौथ्या व पाचव्या नंदीकोल काठी ठेवण्याचे पारंपरिक स्थान आहे. मात्र त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या जुन्या विद्युत खांबामुळे नंदीकोल काठी ठेवताना अडथळा निर्माण होत होता. तसेच विद्युत तारा जवळ असल्याने अनेक वेळा स्पार्क होण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे नाईलाजास्तव नंदीकोल काठीचे स्थान तात्पुरते मंदिराच्या शेजारी हलविण्यात आले होते. ही बाब मंदिराचे विश्वस्त श्री प्रसाद बाळासाहेब कुमठेकर यांनी नगरसेवक प्रविण दर्गोपाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या समस्येवर तात्काळ पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार राणी लक्ष्मीबाई मंडई महावितरण शाखेमार्फत सदर विद्युत खांब कायमस्वरूपी हटविण्यात आले.
सेक्शनअधिकारी अमीर मणियार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून मंदिरासह परिसरातील पाच घरांची वीजजोडणी पर्यायी पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खांब स्थलांतर न करता तो पूर्णपणे काढून टाकण्यात आला. सदर कामासाठी सोलापूर शहर महावितरणचे कार्यकारी अभियंता राजकुमार पाटील व उपकार्यकारी अभियंता हेमंत ताकपिरे यांनी मोठं सहकार्य केले. तसेच लाईनमन राहुल दड्डे यांनी प्रत्यक्ष कामात सहकार्य केले. मंदिराचे विश्वस्त श्री प्रसाद बाळासाहेब कुमठेकर यांनीही कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. या कामामुळे मंदिर परिसरातील अडथळा दूर झाला असून मंदिर विश्वस्त व भाविकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नगरसेवक प्रविण दर्गोपाटील यांनी सांगितले की, श्रींची सेवा करण्याची संधी मिळाल्याने आत्मिक समाधान मिळाले असून आमदार विजय मालक देशमुख यांच्या प्रेरणेने जनसेवेचे कार्य अधिक उत्साहाने सुरू ठेवणार आहोत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form