श्री कालिकादेवी चैत्र शुध्द पंचमी महोत्सव २०२६ चे आयोजन....

सोलापूर प्रतिनिधी -- विश्वब्राह्मण समाज कालिका सेवा मंडळ ट्रस्ट, सोलापूर यांच्या वतीने श्री कालिकादेवी चैत्र शुध्द पंचमी महोत्सव२०२६ सालाबादप्रमाणे ट्रस्टच्यावतीने श्री कालिका मंदिर, शुक्रवार पेठ सोलापूर येथे फाल्गुन कृ. ११ शके १९४७ ते चैत्र शुध्द ५ शके १९४८ रविवार दि.१५ मार्च २०२६ते सोमवार दि.२३मार्च २०२६ पर्यंत या कालावधीत श्री कालिका देवी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कालिका देवी चैत्र शुद्ध पंचमीला दररोज कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत रविवार दि. १५ मार्च रोजी उत्सवमुर्ती स्थापना व ग्रंथ पूजा स. ८ वा. सतिश मोनप्पा म्हेत्रे तसेच रविवार दि. १५ मार्च ते रविवार २२मार्च पर्यंत श्री दुर्गा सप्तशती पाठ मार्गदर्शन सकाळी ९ ते १२.३० सौ. प्रतिभा नागेश महामुनी सौ. शैलजा नागेश कुरुलकर कु. रेखा जोशी हे करणार आहेत तर रविवार दि. १५/३/२०२६ नित्य दैनंदिन पूजा दररोज स. ८ वा. हस्ते नागेश वसंतराव कुरुलकर हे करणार आहेत. शुक्रवार दि. २० मार्च २०२६ रोजी कुंकुमार्चन सायं. ५ ते ७ यामध्ये सहभाग सौ. प्रतिभा नागेश महामुनी, सौ. शैलजा नागेश कुरुलकर, कु. रेखा जोशी हे करणार आहेत.सोमवार दि. १६ मार्च २०२६ रोजी रुद्राभिषेक सकाळी ८:३० ते ९:३० यादरम्यान होईल तर रविवार दि. २२ मार्च २०२६ रोजी नवचंडी यज्ञ दु. ४ ते सायं. ८ यजमान श्री. व सौ. सतीश मोनप्पा म्हेत्रे या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात येणार आहे. सोमवार दि. २३ मार्च २०२६ रोजी पालखी मिरवणूक स. ८ ते ११ श्री कालिका देवीस अर्पण केलेल्या वस्तुचा लिलाव १२ ते २ व महाप्रसाद १२ ते ४ असा नित्यक्रम असणार आहे तसेच सोमवार दि. २३ मार्च २०२६ रोजी श्री कालिका देवीची महाआरती यजमान श्री. व सौ. प्रसाद बाळासाहेब कुमठेकर यांच्या हस्ते होणार आहे. तरी या कार्यक्रमास आपण सहकुटूंब सहपरिवार उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष उमेश रंगनाथअण्णा कुरुलकर उत्सव समिती अध्यक्ष प्रसाद बाळासाहेब कुमठेकर यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form