मुंबईतील भक्ती कुंभ महासोहळ्यात संत नरहरी महाराजांच्या पादुकांचा सहभाग

*सोलापूर सोनार संस्थेचे भाविकांना आवाहन*. सोलापूर ----- दैनिक सकाळ आयोजित भक्तीचा महाकुंभ सोहळ्यानिमित्त दिनांक 21 व 22 मार्च रोजी मुंबईतील एनएससीआय डोम, नेहरू तारांगण जवळ, वरळी येथे महाराष्ट्रातील 10 थोर संतांच्या पादुकाचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. या विशेष सोहळ्यात पंढरपूर येथील संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या पादुकांचा ही समावेश करता येणार आहे. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे संत नरहरी महाराज समाधी मंदिर, महाद्वार पंढरपूर चे कार्यवाहक श्री. संजयजी आष्टीकर हे स्वतः पादुका घेऊन मुंबई ला रवाना होत आहेत. आष्टीकर परिवार ही महाराजांच्या सेवेतील तिसरी पिढी असून त्यांच्या निष्ठेचा आणि अखंड सेवेचा हा गौरव आहे. या उपक्रमासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष श्री. आनंदराव पालकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे औचित्य साधून सोनार समाज संस्था सोलापूर चे अध्यक्ष श्री. वसंत पोतदार यांनी आवाहन केले आहे की, जे समाज बांधव पंढरपूर ला येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी मुंबईत ही दर्शनाची मोठी संधी चालून आली आहे. तरी जास्तीतजास्त समाज बांधवानी या भक्ती सोहळ्यात सहभागी होऊन दर्शन लाभ घ्यावा. या सोहळ्याचे अधिक माहितीसाठी भाविकांनी कार्यवाहक श्री. संजय आष्टीकर मोबाईल नंबर 99214 30149 यावर संपर्क साधावा.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form