कै.बाळासाहेब कुमठेकर परिवार यांच्या वतीने सेवा अर्पण
सोलापूर प्रतिनिधी -- विश्वब्राह्मण समाज कालिका सेवा मंडळ ट्रस्ट, सोलापूर यांच्या
वतीने श्री कालिकादेवी चैत्र शुध्द पंचमी महोत्सव२०२६ सालाबादप्रमाणे
ट्रस्टच्यावतीने श्री कालिका मंदिर, शुक्रवार पेठ सोलापूर येथे फाल्गुन कृ. ११ शके
१९४७ ते चैत्र शुध्द ५ शके १९४८ रविवार दि.१५ मार्च २०२६ते सोमवार दि.२३मार्च २०२६
पर्यंत या कालावधीत श्री कालिका देवी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चैत्र
शुद्ध पंचमी निमित्त श्री कालिका देवीचे गर्भगृह आणि शिखर संपूर्ण सुंदर व सुबक कलर
काम कै. बाळासाहेब कुमठेकर यांच्या स्मरणार्थ सदर सेवा प्रसाद कुमठेकर व परिवार
यांनी अर्पण केली आहे. यापूर्वी 2024 साली चैत्र शुद्ध पंचमीला मुंबईचे सुप्रसिद्ध
कलाकार श्री नाना वेदक यांच्याकडून चांदीचा किरीट सोन्याचा मुलामा करून कै.
बाळासाहेब रामचंद्र कुमठेकर यांच्या स्मरणार्थ सेवा अर्पण केली तसेच 2025 साली
चैत्र शुद्ध पंचमीला श्री कालिका देवीचे शस्त्र व कंगन सोन्याचा मुलामा चढवणे सेवा
अर्पण केली आहे व यावर्षी म्हणजे 2026 साली चैत्र शुद्ध पंचमी श्री कालिका देवीचे
गर्भगृह आणि शिखर संपूर्ण कलर काम करून कै. बाळासाहेब कुमठेकर यांच्या स्मरणार्थ
सेवा अर्पण केली आहे.सदर कलरचे काम सोलापूरचे सुप्रसिद्ध कलाकार पेंटर विशाल कांबळे
यांनी पूर्ण केले आहे.

