*सोनारसमाज संस्था सोलापूर तर्फे समाजातील सुवर्ण कन्यांचा डिजिटल गौरव*.

सोलापूर --- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोनार समाज संस्था सोलापूर च्या वतीने समाजातील उच्च शिक्षित आणि विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या भगिनींचा "डिजिटल सन्मान " करण्यात आला . प्रत्येक्ष सोहळा न घेता सोशल मीडियाच्या माध्यमातून या भगिनींच्या कर्तृत्वाची दखल घेऊन समाजात मानाचे स्थान मिळवून देण्याचा एक स्तुत्य उपक्रम संस्थेने राबविला आहे. *तंत्रज्ञान आणि शिक्षणाची सुवर्णं भरारी* --- समाजातील 11 इंजिनिअर उच्च शिक्षित भगिनींनी तंत्रज्ञान क्षेत्रात आपले नांव कोरले आहे . त्यांच्या या कष्टाचा आणि बुद्धीमत्तेचा संपूर्ण समाजाला सार्थ अभिमान आहे.तसेच इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून आपल्या जोडीदाराच्या सराफी व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणाऱ्या 04 विशेष भगिनींचा गौरव करण्यात आला . " इंजिनिअरिंग ची दृष्टी आणि सराफी ची सृष्टी " यांचा संगम समाजासाठी आदर्श ठरत आहे. *प्रशासकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मानबिंदू* --- केवळ तंत्रज्ञानच नव्हे तर समाजाचा पाया भक्कम करणाऱ्या इतर भगिनींचाही समावेश आहे. प्रशासन -- महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या भगिनींनेही समाजाचा प्रशासकीय ठसा उमाटविला आहे. शिक्षण --समाजाला सुसंस्कृत पिढी देणाऱ्या 04 मुख्याध्यापिका आणि एक सह शिक्षिका यांचा संस्थेने अभिमानाने उल्लेख केला आहे . समाजसेवा -- बाल संस्काराचा पाया रचणाऱ्या अंगणवाडी सेविका भगिनीच्या निःस्वार्थ सेवेचेही संस्थेने कौतुक केले आहे. सोनार समाज संस्था सोलापूर च्या वतीने सर्व अग्रणी प्रवर्तक, पदाधिकारी आणि संचालकानी या सर्व रणरागिणीना सोशल मीडिताच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. प्रत्येक घराघरात अशाच उच्च शिक्षित लेकी,सुना घडाव्यात हीच या उपक्रमाची भावना असल्याचे संस्थेने नमूद केले आहे. *यांचा झाला गौरव* *इंजिनिअर क्षेत्र ( नोकरी )* 1 ) इंजि. सौ. माधवी पोतदार, सोलापूर 2 ) इंजि. सौ. वंदना कोडीतकर पुणे, 3 ) इंजि. कु. श्रुती वेदपाठक पुणे, 4 ) इंजि. सौ. श्रुती धर्माधिकारी मसूर, 5 ) इंजि. सौ. अपर्णा जमखंडीकर सोलापूर, 6 ) इंजि. सौ. किरण जमखंडीकर, सोलापूर 7) इंजि. प्रा. सौ. अश्विनी पंडित सोलापूर, 8 ) इंजि. सौ. चैत्राली मल्लाबादी कोरेगाव सातारा, 9 ) इंजि. कु. सिद्धी दीक्षित बेंगलोर, 10 ) इंजि. कु. श्रद्धा पोतदार पुणे, 11 ) इंजि. सौ. सुप्रिया दीक्षित सोलापूर, 12 ) इंजि. सौ. मृणाल पोतदार नार्वे, 13 ) इंजि. कु. श्रद्धा वेदपाठक, सोलापूर, 14 ) इंजि. सौ. मयुरी पंडित पूणे, 15 )इंजि. सौ. सविता पंडित पुणे, 16 ) इंजि. सौ. स्नेहा पंडित पुणे, 17 ) इंजि. कु. दीपा दोडमनी सोलापूर. *इंजिनियर शिक्षण घेऊन सराफी व्यवसायात कार्यरत*. 18 )इंजि. सौ. अमृता वेदपाठक माढा, 19 )इंजि. सौ. श्रेया दीक्षित पुणे, 20 ) इंजि. सौ. शिवानी मैंदर्गीकर सोलापूर, 21 ) इंजि. सौ. पूनम वेदपाठक सोलापूर, 22 ) इंजि. सौ. समृद्धी कारीकर सोलापूर, 23 ) इंजि. सौ. कौशिकी कारीकर कोल्हापूर, 24 ) इंजि. सौ. प्रिन्सा महामुनी पांढरकवडा. *शिक्षण क्षेत्र ( मुख्याध्यापिका /सह शिक्षिका )*. 25 ) श्रीमती राजश्री पोतदार सोलापूर, 26 )सौ. कुमुदिनी वेदपाठक सोलापूर, 27 ) सौ. सीमा कोरोलीकर सोलापूर, 28 ) सौ. राजश्री पोतदार , जि. प. प्रा. शाळा उजनी वसाहत करकंब पंढरपूर 29 ) सौ. मेघाराणी सुहास महामुनी जि. प. प्रा. शाळा करकंब मुली नं. 2 ( पंढरपूर) 30 ) प्रा. सौ. श्रद्धा भास्करे माढा . *बाल संस्काराचा पाया*. 31 ) सौ. गायत्री वेदपाठक सोलापूर *प्रशासकीय सेवा*.... 32 ) पल्लवी भास्करे ग्राम महसूल अधिकारी, हागलूर सझा, सोलापूर. 33 ) सौ. पल्लवी पंडित कार्यक्रम समन्व्यक अधिकारी जि. प. ( आरोग्य विभाग ) सोलापूर. *सुवर्ण रणरागिणी, अष्टपैलू व बहूआयामी कर्तृत्व* 34 ) सौ. चित्रा पोतदार सोलापूर, 35 ) सौ. विजया मंद्रूपकर सोलापूर 36 )सौ. मृणालिनी मैंदर्गीकर सोलापूर , 37 ) सौ. संध्या कळमणकर सोलापूर, 38 ) सौ. पल्लवी महामुनी सोलापूर.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form