पंढरपूर /प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट सहकार सेलच्या
सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी गणेश सूर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष
नागेश फाटे यांच्या हस्ते गणेश सूर्यवंशी यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यास
शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे म्हणाले की
गणेश सूर्यवंशी यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात
आली आहे. त्यांनी पुढची काळात पक्ष मजबूत करण्यासाठी पक्षाची विचारधारा
तळागाळापर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून नागरिकांसाठी विकासाचा अजेंडा
राबवावा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी जनता संवादद्वारे न्याय मिळवून देऊन
जबाबदारी पार पाडण्याची अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीरंग बागल,
उद्योजक नवनाथ बचुटे, गणेश दुरुतकर, डॉ.रमेश फाटे, संजय बागल, बाळासाहेब देशमुख,
संग्राम कापसे उपस्थित होते.
