*गौरव आणि कोमल यांचा उद्या कोपरगावी पुनर्विवाह* *नाशिकरोड (प्रतिनिधी)* : 'सर्व
शाखीय सोनार समाजाचे अभेद्य संघटन व्हावे, सोनार समाजाच्या विविध समस्यांची सोडवणूक
सामूहिक प्रयत्नांतून कशी करता येईल, यावर सातत्याने समाजप्रबोधन आणि समुपदेशन
करणारे व्यासपीठ' म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात तसेच गुजरात आणि उत्तर भारतात
ओळखल्या जाणाऱ्या 'सकल भारतीय सोनार समाज संघटन'ने 'विवाहविषयक समस्या आणि संभाव्य
घटस्फोट प्रमाण शून्यावर आणण्यासाठी विशेष कृति आराखडा जाहीर केला होता. सदर कृति
आराखड्यासंदर्भात गेल्या वर्षी पुणे, अमळनेर, कोपरगाव, नाशिक रोड, नाशिक येथे
सहविचार बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकांना उपस्थित असलेल्या स्थानिक सर्व
शाखीय सोनार समाज बांधव आणि भगिनी यांनी कृति आराखड्याचे मनापासून स्वागत केले
होते. कोपरगाव येथील ज्येष्ठ सोनार समाजसेवक, कृति आराखड्यानुसार विवाहनिश्चिती
समुपदेशन समिती सदस्य, 'अहिल्यानगर जिल्हा सकल भारतीय सोनार समाज संघटन'चे ग्रुप
ॲडमिन, 'श्री संत नरहरी लाड सुवर्णकार संस्था, महाराष्ट्र राज्य, श्री क्षेत्र
त्र्यंबकेश्वर'चे विश्वस्त, सहसेक्रेटरी श्री. प्रकाशशेट भडकवाडे यांनी कोपरगाव
येथील लाड सुवर्णकार युवक मंडळाचे अध्यक्ष श्री. संतोषशेट देवळालीकर यांच्या
उपस्थितीत कोपरगाव येथील गौरव सुनील सोनार आणि अहिल्यानगर येथील कोमल बबनराव उदावंत
(दीड वर्षाचे एक अपत्य असलेली माता) यांचा पुनर्विवाह यशस्वीरीत्या निश्चित केला.
श्री. भडकवाडे यांनी गौरव आणि कोमल यांना तसेच त्यांच्या पालकाना समुपदेशन करताना
सांगितले की, गौरव आणि कोमल हे एकमेकांना अनुरूप आहेत. त्यांनी पसंतीही दर्शविली
आहे. दिवसेंदिवस तुमचे वय वाढत आहे. तेव्हा या दोघांची सोयरिक करावी आणि लवकरात
लवकर त्यांचा पुनर्विवाह कसा निश्चित होईल, याचा सकारात्मक विचार करावा.
बाळालादेखील पितृछत्र लाभेल. आधीच अवाजवी तसेच अवास्तव अपेक्षांचे ओझे घेऊन उपवर
मुला मुलींचे पालक 'अधिक अनुरूप स्टेटस् असलेले स्थळ लाभेल,' या अनाठायी
आकांक्षेपोटी पालकांना अनुरूप असूनही लवकर होकार देत नाहीत. परिणामी, उपवर मुला
मुलींची वये वाढत आहेत. विवाहयोग्य वयात विवाहनिश्चिती होत नसल्याने उपवर मुला
मुलींना तिष्ठत बसावे लागत आहे. घटस्फोटाचे प्रमाणदेखील वाढत आहे. अशावेळी अधिक
विचार न करता, गौरव आणि कोमल यांची सोयरिक व्हावी, यासाठी दोन्हीकडच्या पालकांनी
पुढाकार घ्यावा. श्री. भडकवाडे यांच्या समुपदेशनास श्री. संतोषशेट देवळालीकर
यांनीदेखील पुष्टी दिली. दोन्ही पालकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सोयरिक करण्यास
होकार दिला. गौरव आणि कोमल यांचा विवाह उद्या दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी
दुपारी १ वाजून ३१ मिनिटांनी संत नरहरी विट्ठल मंदिर, पांडेगल्ली, सराफ बाजार,
कोपरगाव येथे संपन्न होत आहे. पुनर्विवाह जुळवून आणल्याबद्दल विवाहनिश्चिती
समुपदेशन समिती सदस्य श्री. प्रकाशशेट भडकवाडे, श्री. संतोषशेट देवळालीकर तसेच गौरव
याची आई श्रीमती निशाताई सुनीलशेट सोनार आणि मामी श्रीमती रतनबाई पांडुरंग मोरस्कर,
गौरव सुनील सोनार, कोमल बबनराव उदावंत, कोमलचे वडील श्री. बबनराव उदावंत यांचे सकल
भारतीय सोनार समाज संघटन चे संस्थापक मिलिंदकुमार सोनार, सहसंस्थापक सर्वश्री
शांताराम गोपाळशेट दुसाने, प्राचार्य श्री. किरण रघुनाथ दुसाने, श्री. विकास
शांताराम विसपुते, विवाहनिश्चिती समुपदेशन समिती सदस्य सौ. करुणाताई सोनार
(अमळनेर), सौ. मेघाताई संतोषकुमार डहाळे (अहिल्यानगर), ज्येष्ठ सोनार समाजसेवक
श्री. सुभाष दीक्षित (पुणे), श्री. राजन वाघ (पुणे), श्री. राजूदादा सोनार (नाशिक),
श्री. दिलीपतात्या देवरे (नाशिक), श्री. सुनील माळवे (वावी), 'सोनार, सोनी
स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्र (कानूनी परामर्श केंद्र)' चे पुणे
जिल्हा समन्वयक ॲड. जगदीश बी. विसपुते, नाशिक जिल्हा समन्वयक ॲड. स्वप्निल सुधाकर
विसपुते, धुळे जिल्हा समन्वयक ॲड. (डॉ.) राजेंद्र निकुंभ, जिल्हा सहसमन्वयक ॲड.
अमित मधुकर दुसाने आदींनी अभिनंदन केले आहे.
