पंढरपूर (प्रतिनिधी): येथील श्री विठ्ठल अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.
पंढरपूर या संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात
आला. या निमित्ताने संस्थेच्या कार्यालयात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन सोहळा
आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे चेअरमन श्री. नागेश फाटे यांच्या शुभहस्ते दीप
प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. गेल्या दोन
वर्षांत संस्थेने केलेल्या प्रगतीचा आढावा घेत, सभासदांच्या विश्वासार्हतेमुळेच हे
यश साध्य झाल्याचे श्री. फाटे यांनी यावेळी नमूद केले. याप्रसंगी व्हा. चेअरमन
श्री. अण्णा यशवंत नागटिळक, डॉ. रमेश फाटे, , श्री हणमंत काळे,श्री. उमेश फाटे, ,
श्री अर्जुन सावंत, श्री. बाळासाहेब बागल,श्री. अभिमन्यू पवार ,श्री ओंकार
फाटे,औदुंबर कांबळे, श्री. औदुंबर माने, श्री.संजय पवार,श्री शिवाजी रणदिवे,श्री
गोरख बागल, श्री श्रीराम तांदळे,श्री शशिकांत बागल, श्री शांतीनाथ बागल, श्री संजय
बागल, श्री समाधान सुभाष फाटे, श्री बाळासो फाटे, मॅनेजर संग्राम कापसे, श्री. विनय
शिंदे, सौ. स्वप्नाली घोडके, सौ. हर्षा सुतार, श्री. सुमित बागल, श्री. योगेश फाटे,
श्री. निवृत्ती भटकर, श्री. ज्ञानेश्वर पवार, श्री. श्रीधर पिसे आणि श्री. शरद
थिटे. हे मान्यवर उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या वतीने राबविण्यात
येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे नेटके नियोजन मॅनेजर
संग्राम कापसे व कर्मचारी वृंदाने केले होते. या सोहळ्याला हितचिंतक व सभासदांनी
मोठ्या संख्येने उपस्थित राहून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
