पंढरपूरात स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेचा भव्य सन्मान सोहळा, व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण*

पंढरपूर, प्रतिनिधी : पंढरपूर येथील योग भवन भक्ती मार्ग येथे आज स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना पश्चिम महाराष्ट्र व पंढरपूर तालुका-शहर यांच्या संयुक्त विद्यमाने *संघटनेचे महासचिव श्री कमलेशजी शेवाळे सर* यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान सोहळा व ओळखपत्र वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपकजी कांबळे होते. प्रमुख उपस्थिती पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, वरिष्ठ पत्रकार व ‘पंढरी वार्ता’चे मुख्य संपादक राजाभाऊ शहापूरकर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सदर कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांचे व सर्वांचे स्वागत करून पंढरपूर शहराध्यक्ष रवी सोनार यांनी प्रस्ताविका सादर केली त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री कैलास कारंडे यांनी संघटनेच्या कार्याविषयी सविस्तर माहिती सर्वांना सांगितली व संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींना स्वराज्य सन्मानपत्र दिले यावेळी संघटनेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, साहित्य, उद्योग, कला व कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना *“स्वराज्य सन्मानपत्र”* प्रदान करून गौरविण्यात आले.
*शिक्षण क्षेत्रात विठ्ठलराव पाटील, साहित्य क्षेत्रात नागेश सिंगन, आरोग्य क्षेत्रात डॉ. अमित पावले, उद्योग क्षेत्रात परेश शहा मरवडेकर, कृषी क्षेत्रात सुभाष गंगथडे कला क्षेत्रात मिताली कोळी आदींचा सन्मान करण्यात आला.* विविध क्षेत्रांत दिलेल्या उत्कृष्ट सेवेसाठी हा गौरव करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. सदर पुरस्कार दिल्यानंतर पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीने संघटनेचे मिळालेल्या पुरस्काराबद्दल कृतज्ञता पूर्वक आभार व्यक्त केले सदर कार्यक्रमाच्या वेळी पंढरपूर *शहर पोलीस स्टेशनचे श्री दशरथ वाघमोडे साहेब* यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक केले, यापुढे संघटनेला मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच *पंढरी वार्ता चे संपादक श्री राजाभाऊ शहापूरकर* यांनी पत्रकारिते विषयी सदस्यांना उत्कृष्ट प्रकारे मार्गदर्शन केले तसेच संघटनेचे *संस्थापक अध्यक्ष श्री दीपक सर कांबळे* यांनी माहिती अधिकार याविषयी सदस्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाच्या वेळी संघटनेच्या विश्वस्त सौ धनश्री ताई उत्पात व काशीकर गुरुजी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामभाऊ बडवे पश्चिम महाराष्ट्र महिलाअध्यक्ष शोभाताई खेडकर तसेच जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत दादा वेदपाठक यांनी सदस्यांना संबोधित केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र तसेच पंढरपूर तालुका व शहरातील नव्याने नियुक्त पदाधिकारी व सदस्यांना संघटनेचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुकाध्यक्ष प्रवीण सुरवसे यांनी सर्व पदाधिकारी व सदस्यांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे तालुका प्रवक्ते श्री संतोष चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास विश्वस्त धनश्री ताई उत्पात, विश्वस्त उमेशजी काशीकर ,संचालक श्री श्रीकांत देशपांडे साहेब, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीराम बडवे,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलासजी कारंडे, कार्याध्यक्ष उमेश ढोबळे, पश्चिम महाराष्ट्र संघटक विजय वाघमारे जिल्हा संघटक सौ ज्योतीताई शेटे पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रवीण सुरवसे, शहराध्यक्ष रवी सोनार, महिला तालुकाध्यक्ष शोभा बडवे, तालुका उपाध्यक्ष सुवर्णा कुरणावळ, तालुका उपाध्यक्ष नागेश राहिरकर, कार्याध्यक्ष शिवलिंग वसेकर, तालुका प्रवक्ते संतोष चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख दत्तात्रय पांढरे ,प्रकाश आलदर ,लक्ष्मण अभंगराव, अजित धतींगे , राम अभंगराव, दत्ता कमले ,शंकर कवडे ,संजय चौगुले, रवी वाळके ऋतुजा उत्पात यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास कारंडे यांचे अनमोल मार्गदर्शन झाले यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र व पंढरपूर तालुका .- शहरातील महिला अध्यक्ष सौ शोभाताई बडवे ,सौ मेघा मोळक, सौ जाधव ,शहराध्यक्ष सौ म्हमाणे, सौ तिवारी, सौ कापसे तसेच सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form