वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई

पंढपूरात शहर पोलीसांची १०५ वाहनांवर कारवाई:५७ हजारांचा दंड वसूल
पंढरपूर दि.०२:- वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पंढरपूर शहर पोलीसांनी रविवारदि.०१ फेब्रुवारी रोजी विशेष मोहीम राबवली. यामध्ये १०५ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करुन ५७ हजार ९०० रुपये दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरिक्षक दशरथ वाघमोडे यांनी दिली. पंढरपूर शहरात श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात तसेच शहरात मोठी बाजारपेठ , दवाखाने, शासकीय कार्यालयात कामकाजासाठी दररोज विविध भागातील हजारो नागरिक दुचाकी, चार चाकी अथवा इतर वाहनांने येतात. मात्र गेल्या काही ‍ दिवसांपासून ट्रिपल प्रवास, फॅन्सी नंबर, विना परवाना, विना नंबर, कर्कश आवाजाचे सायलन्सर बसविणे तसेच विरुध्द दिशेन गाडी चालविणे यामुळे सतत वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. याला आळा घालण्यासाठी शहर पोलीसांनी विशेष मोहिम राबवून १०५ वाहनचालकांवर कारवाई केली. सदर कारवाई सहा पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, शहर पोलीस निरिक्षक दशरथ वाघमोडे, वाहतुक शाखेचे ठाणे अंमलदार, होमगार्ड यांनी केली. ०००००००००००

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form