कोर्टी (प्रतिनिधी): कोर्टी येथील ज्योतिर्लिंग बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या
वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कोर्टी येथील फाटे ट्रॅक्टर शोरूम येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
ह्यावेळी शिवछत्रपतींच्या मूर्तीचे पूजन अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष
गुलाब भाई मुलांनी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांनी 'जय भवानी,
जय शिवाजी'च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या सोहळ्याला ज्योतिर्लिंग
बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेचे अध्यक्ष श्री. नागेश फाटे, डॉ. रमेश फाटे, शुभम
फाटे, शशांक फाटे, संतोष पुणेकर, ओंकार कथले, बेबन आदमीले मॅडम, विशाल धांडोरे,
अनिल जाधव, ओंकार मासाळ, समाधान बागल, ऋषिकेश बागल, वसिम मुलानी, रमेश बेलकर, शरद
थिटे, आनंद सकटे यांसह अनेक पदाधिकारी आणि शिवप्रेमी उपस्थित होते. ज्योतिर्लिंग
बहुउद्देशीय समाजसेवी संस्था यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे सर्व स्तरांतून
कौतुक होत असून, सामाजिक सलोखा आणि शिवरायांचे विचार घराघरांत पोहोचवण्याचा संकल्प
यावेळी करण्यात आला.
