पंढरपूर प्रतिनिधी - पंढरपूर येथील स्टेशन रोडवर
असणाऱ्या एस टी कदम ज्वेलर्स चे मालक दिलीप कदम यांना परवा रात्री अज्ञात लोकांनी
चारचाकी गाडी ने धडक देऊन जखमी करुन त्यांच्या जवळील रोख रक्कम व ऐवज आसलेली बॅग
पळवून नेली वारंवार सराफांच्या बाबत आशा घटना घडत आहेत आशा घटनांना पायबंद
घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करून आसे कृत्य करणारास कडक शिक्षा करावी.
या साठी भारतीय नरहरी सेना प्रणित सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य
अक्रमक झाली असून त्याचाच एक भाग म्हणून आज उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डगळे
साहेब व वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमोडे साहेब यांना लेखी निवेदन देण्यात आले.
निवेदनात सदर घटनेची सखोल व तत्काळ चौकशी करून दोषींना त्वरित अटक करण्यात यावी व
त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी पंढरपूर व परिसरातील सराफ सुवर्णकार व सलग्न
व्यवसायिक यांची सुरक्षाविषयक बैठक घेऊन त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात यावे
स्थानिक पोलीस प्रशासन व सराफ बांधव यांचा समन्वय साधण्यासाठी पोलीस मित्र या
नावाने अधिकृत व्हाट्सअप ग्रुप स्थापन करण्यात यावा जेणेकरून तातडीची माहिती
देवाण-घेवाण व सुरक्षा नियोजन सुलभ होईल सराफ बाजार व प्रमुख व्यापारी भागात पोलीस
गस्त वाढवण्यात यावी दर दोन महिन्यांनी पोलीस अधिकारी व सराफ बांधव यांची संयुक्त
बैठक घेऊन सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्यात यावा त्या दरम्यान आवश्यक त्या सूचना
देण्यात याव्यात आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या... या वेळी बोलताना
भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष धर्मभुषण. काकासाहेब बुराडे म्हणाले की
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सराफ व्यापार्यावर हल्ले होण्याच्या घटना वारंवार
घडत आहेत सराफांच्या दुकानातुन तर कधी सराफ घरी जात असताना लुटमार केली जात आहे. आज
सोन्याच्या भावाने गगन भरारी घेतली आहे आसे असताना सराफ व्यवसाय करणे अवघड व
जिकिरीचे झाले आहे त्यातच आशा लुटमारीच्या घटनेन सराफ व्यावसायिक त्रस्त झाले आहेत
सराफ सुवर्णकारांना संरक्षण देणे हे सरकारचे कर्तव्य आहे त्या साठी सरकारने सराफ
सुवर्णकारांना स्वसंरक्षणासाठी बंदुकीचे परवाने देण्यात यावेत. या वेळी बोलताना
सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष उमेशजी बुर्हाडे म्हणाले राज्यात
विविध ठिकाणी सराफ व्यवसायिकांवर अशा प्रकारचे हल्ले व लूटमारीच्या घटना घडताना
दिसत आहेत. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक उरलेला नाही ही अत्यंत चिंताजनक बाब आहे
झालेला प्रकार हा केवळ चोरी करण्याच्या उद्देशाने झाला की जाणीवपूर्वक जीवघेणा
हाल्ला करण्याचा प्रयत्न होता. याची चौकशी झाली पाहिजेत पोलीस प्रशासन व सराफ
सुवर्णकार यांच्यात समन्वय वाढवणे गरजेचे आहे सुरक्षेच्या दृष्टीने प्रभावी पावले
उचलली गेल्यास भविष्यात अशा घटना टाळण्यास मोठी मदत होणार आसल्याने प्रशासनाने या
गंभीर प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी.आशी अपेक्षा
प्रदेशाध्यक्ष उमेशजी बुर्हाडे यांनी यावेळी व्यक्त केली. या वेळी भारतीय नरहरी
सेनेचे संस्थापक अध्यक्ष धर्मभुषण काकासाहेब बुराडे सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे
प्रदेशाध्यक्ष उमेशजी बुर्हाडे यांच्या सह ,उमेश बागडे, सचिन बनकर, बालाजी दीक्षित,
विशाल ढवळे, ओंकार डाळे, निखिल दीक्षित, अमोल हेलाले, दिलीप सिदवाडकर, अवताडे कदम
,गणेश मेडे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते
