श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज यांचा ७४० वा समाधी दिन सोहळा उत्साहात साजरा

पंढरपूर प्रतिनिधी:- सोनार समाजाचे आराध्य दैवत श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज यांचा ७४० वा समाधी दिन सोहळा त्यांच्या मुळ वास्तव्याच्या ठिकाणी म्हणजे महाव्दार पंढरपूर येथे मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. ७ दिवस चाललेल्या या सोहळ्यामध्ये भजन, विश्वकर्मा जयंती, होमहवन, दररोज सकाळी काकडा, हरीपाठ, कीर्तन संगीत भजन, सांप्रदायिक भक्तीगीते सादर करण्यात आले. श्री. अंकुश दिक्षितबुवा, मुंबई यांचे सांप्रदायिक संगीत भजन, श्री. अथर्व वेदपाठक यांची भक्तीगीते, तर ह.भ.प. श्री. धनराज महाराज वेदपाठक, तोरंभ, आबा महाराज शिरगावकर आणि अनिलबुवा शिंदे, वीर यांचे कीर्तन सेवा झाली, भजन आणि भारूड चंदाताई तिवाडी राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या यांचे संगीत भजन आणि भारूड सादर केले. संस्थेचे अध्यक्ष आनंतराव अच्युतराव पालकर यांचे चिरंजीव सौ. व श्री. अमोल पालकर यांच्या हस्ते श्री. प्रशांत महामुनी गुरूजी यांनी समाधीची शास्त्रोक्त महापुजा केली. सर्वश्री. सदानंद महामुनी, सुयश महामुनी, सुचित महामुनी यांनी वेदपठण केले. ह.भ.प. केशव महाराज नामदास यांनी गुलाल पुष्पवृष्टीचे नरहरी महाराजांच्या समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. महाप्रसाद वाटप करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. मोहनराव महादेवराव मंद्रूपकर यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेमध्ये विश्वस्त सदस्य, आश्रयदाते सदस्य, हितचिंतक सदस्य, शाश्वत पुजा सदस्य, नरहर भक्त आणि समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. संस्थेचे कार्यवाह सर्वश्री. संजय सुभाष क्षीरसागर (आष्टीकर), सहकार्यवाह आनंद वि. कासेगांवकर, खजिनदार सुरेश पंडीत, लो. ऑडीटर गणेश भा. भास्करे, वसंतराव बारसकर, सदस्या सौ. अंजलीताई र. वेदपाठक, सल्लागार मंडळ धनंजय क्षीरसागर, मनोज कासेगांवकर, संजय रोपळकर, दिपक वेदपाठक, संजय महामुनी, आणि महोत्सव समिती अध्यक्ष स्वप्नील ना. कमसल, उपाध्यक्ष विशाल सं. दिक्षीत, सचिव गणेश वा. पंडीत, सहसचिव सौ. कल्पनाताई ह. पोतदार,, समाजबांधव उपस्थित होते. वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातवरणात पार पडली. सोहळ्यामध्ये ह.भ.प. बोरसे महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. कालाप्रसाद श्री. सुधीर नागनाथ कासेगांवकर, तुळजापूर यांच्यावतीने दिला. सायंकाळी श्री नरहरी महाराजांची पालखी सजावट करून चार चाकी रथातून नगरप्रदक्षिणा रोडवरून शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणूकीत विठ्ठल आणि नरहरी महाराजांचे वेशभुषा केलेले देखावे व त्यांनी नरहरी महाराजांचे चरित्र सादर केले. या संपूर्ण सोहळ्याचे सुयोग्य नियोजन कार्यवाह सर्वश्री संजय सुभाषराव क्षीरसागर (आष्टीकर), सहकार्यवाह आनंद कासेगांवकर आणि प्रशांत महामुनी गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक उत्सव समितीचे अध्यक्ष सर्वश्री. स्वप्नील कमसल आणि सर्व पदाधिकारी सदस्य, विश्वस्त मंडळ, मोहनराव महादेव मंटुपकर, सुरेश पंडीत, गणेश भास्करे, वसंतराव बारसकर, सौ. अंजली वेदपाठक, सल्लागार समिती धनंजय क्षीरसागर, मनोज कासेगांवकर, संजय रोपळकर, दिपक महामुनी, संजय वेदपाठक, आणि समाज बांधव यांनी केले होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्यवाह जितेंद्र कासेगांवकर, महोत्सव समिती सर्व सदस्य, समाज बांधव सर्वश्री. हरीष पोतदार, केशवराव महामुनी (गुरूजी), शशिकांत पोतदार, राजेंद्र कासेगांवकर, दिपक पंडीत, बसवराव पोतदार, गणेश पंडीत, अनिल महामुनी (गुरूजी), रमेश गहिनीनाथ पंडीत, रमेश महामुनी, विजय कासेगांवकर, पांडुरंग महामुनी, विशाल कोन्हेरीकर, भय्या घोडके, सतीष पारखे, श्रीकांत घोडके, दत्तात्रय रोपळकर, लक्ष्मीकांत कासेगांवकर, महेश धर्माधिकारी, विजय पंडीत (सर), प्रविण महामुनी, विशाल दिक्षित, जीवन श्रीराम जावर, वैभव महामुनी, राहुल सिदवाडकर, नंदकुमार क्षीरसागर, सुमित पारखे, सागर धार्मधिकारी, चंद्रकांत दिक्षीत (पाठस), बिडकर बंधु, आणि समाजातील असंख्य महिलांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाग घेतला होता. अशोक (पवन) इंगळे, ४ ते ५ फडावरील वारकरी वेशातील मुले यांचे समवेत भव्यदिव्य रूपात पालखीची मिरणवूक काढण्यात आली. सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण पांचाळ, सुवर्णकार समाज (सोनार) पंढरपूर व इतर समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी सहकार्यवाह आनंद विश्वंभर कासेगांवकर यांनी सर्वाचे आभार मानले. आपले विश्वासू, ( श्री. संजय सुभाषराव क्षीरसागर (आष्टीकर) कार्यवाह, श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज समाधी मंदिर ट्रस्ट, पंढरपूर

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form