सोनार समाज दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांच्या स्मारका साठी भुखंड द्या.....

भारतीय नरहरी सेना व सोनार समाज पंढरपूर चे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनां निवेदन....
पंढरपूर दि १२ ....सोनार समाज दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार हे संत मांदियाळीतील प्रथम क्रमांक असलेले संत शके १११५ ते शके बाराशे सातला होऊन गेले.. निस्सीम शिवभक्त असणाऱ्या महाराजांना पांडुरंगाने अनेकदा चमत्कार दाखवले. पांडुरंगात विलीन झालेले ते एकमेव संत आहेत. त्यांच्या अगोदर व नंतरही कोणी पांडुरंगात विलीन झाले नाही. अशा थोर संतांची आठवण जगाला राहाण्यासाठी त्यांचे पंढरपूर येथे भव्य स्मारक उभे करण्यासाठी पंढरपूर नगरपालिके कडून भुखंड मीळावा या साठी भारतीय नरहरी सेना व सोनार समाज यांनी या अगोदरही दि ११/९/२०२३ रोजी १९/१/२०२४रोजी व ६/६/२०२४ रोजी विनंती मागणी निवेदने दिली आसल्याचे भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष धर्मभुषण काकासाहेब सुमन बाबुराव बुराडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. पंढरपूर नगरपालिकेन आपल्या मालकीचा भुखंड आम्हास उपलब्ध करून दिल्यास आम्ही त्यावर स्वखर्चाने महाराजांचे भव्य स्मारक उभे करू. या साठी पंढरपूर नगरपालिकेने आम्हाला भुखंड उपलब्ध करून द्यावा असे विनंती निवेदन पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रोकडे साहेब व नगराध्यक्षा डॉ प्रणिताताई भालके यांना आज देण्यात आले या वेळी.मा. उपनगराध्यक्ष नागेशकाका भोसले . महर्षी वाल्मिकी संघाचे गणेश अंकुशराव. मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील. भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष धर्मभुषण काकासाहेब बुराडे सोनार समाज संस्था उपाध्यक्ष संजयशेठ ढाळे . रामचंद्र अष्टेकर समाज उपाध्यक्ष तथा भारतीय नरहरी सेनेचे राज्य महानिरीक्षक लंकेशदादा बुराडे. संस्था खजिनदार राजेश जोजारे प्रसाद भैय्या ढाळे मीलींद महाराज शहाणे . अक्षय पोतदार. गुरूदेवा अष्टेकर आदी जण उपस्थित होते... या वेळी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांच्या ७४० व्या हरिऐक्य सायुज्य समाधी सोहळ्याचे औचित्य साधून श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची आकर्षक प्रतिमा पंढरपूर नगरपालिकेस भेट देण्यात आली...... त्या नंतर श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार समाधी मंदिर महाद्वार येथे मान्यवरांच्या शुभहस्ते कॅलेंडर चे प्रकाशन करून छोटे खानी बैठक झाली बैठकीत सर्व शाखा एकत्रीकरण करून पुढील वर्षी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांचा हरिऐक्य सायुज्य समाधी सोहळा मोठ्या प्रमाणात एकत्रीत साजरा करण्याचे ठरले या वेळी धर्मभुषण काकासाहेब बुराडे.. सराफ सुवर्णकार संरक्षण समिती चे प्रदेशाध्यक्ष उमेशशेठ बुर्हाडे. उमेश बागडे पवन डहाळे श्रीनिवास बानकर बालाजी दिक्षित सचिन बानकर महेश वेदपाठक संजय ढाळे प्रसाद ढाळे सचिन काटकर आनंद कासेगावकर मनोज कासेगावकर विनोद पोतदार बालाजी दिक्षित राजेंद्र कासेगावकर पांडुरंग महामुनी केशव महामुनी विशाल कोन्हेरीकर महेश वेदपाठक आदी सोनार समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form