सराफ सुवर्णकार संरक्षण समितीस मोठे यश

अकलूज प्रतिनिधी-- सचिन बानकर वेळापूर येथील एका सराफस काल चार वाजल्यापासून सोलापूर एलसीबी चे अधिकारी यांनी बेकायदेशीर ताब्यात ठेवून आज बेकायदेशीर घर झडती घेतली व घरातील महिलेच्या अंगावरचे दागिने काढून घेतले यानंतर समितीचे पदाधिकाऱ्यांना समजले तेव्हा पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख सचिन शेठ बानकर यांनी जिल्हा अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष आणि अकलूज शहराध्यक्ष यांना सूचना देऊन अकलूज येथे सर्वजण एकत्रित आले संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कायदेशीर कारवाईची मागणी करून प्रदेशाध्यक्ष यांना संपर्क करून तपास अधिकारी यांच्याशी चर्चा करून दिली बेकायदेशीर ताब्यात घेतलेले सोने रिकवरी माघारी देऊन पोलिसांनी तोंडी तपासाला येण्यास सांगितले व निघून गेले आपला सराफ सुखरूप सोडवण्यात समितीला यश आले यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष गणेशशेठ मैड, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख सचिनजी बानकर, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप जी सिद्धवाडकर, सोलापूर जिल्हा सरचिटणीस विशाल जी दहिवाळ,इंदापूर ता उपाध्यक्ष पवनजी डहाळे, वेळापूर येथील सराफ रवीशेठ वाडकर अकलूज शहराध्यक्ष ओंकार शेठ ढहाळे इ.उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form