*कर्तव्याला भक्ती मानून रेल्वेची प्रदीर्घ सेवा आणि निवृत्तीनंतर ही समाजाप्रती
असलेली अतूट बांधिलकी जपणारे,एक ऋषींतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे श्री. सुरेश
रंगनाथराव महामुनी साहेब*!
*प्रशासकीय वारसा आणि रेल्वेतील वारसा*----
माढा तालुक्यातील रोपळे हे मूळ गांव. वडिलांचा सोनार कामाचा व्यवसाय, थोडीफार
शेतीवाडी. आपल्या मुलांनी पारंपारिक व्यवसायाऐवजी शिकून सवरून इतर व्यवसायात आपले
कर्तुत्व सिद्ध करावे म्हणून प्रतिकूल परिस्थितीत मुलांना उच्चशिक्षित केले.
श्री.सुरेशराव महामुनी यांचे ज्येष्ठ बंधू सोलापूर येथे रेल्वे सेवेत नियुक्त झाले.
सुरेशराव महामुनी यांनी प्राथमिक शिक्षण रोपळे गावी पूर्ण केल्यावर माध्यमिक आणि
महाविद्यालयीन शिक्षण सोलापूर येथे पूर्ण केले.शिक्षण चालू असतानाच अगदी लहान वयात
19 व्या वर्षी रेल्वे सेवेत सिलेक्ट होऊन, *मंडल रेल्वे प्रबंधक मध्य रेल्वे
सोलापूर*,या कार्यालयात *जुनिअर क्लार्क* म्हणून नियुक्त झाले आणि याच कार्यालयातून
मुख्य कार्यालय अधीक्षक कार्मिक या पदावरून निवृत्त झाले. *नेतृत्व आणि कामगार
कल्याण* रेल्वे सेवेत विविध पदावर कार्यरत असताना आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला.
शासकीय सेवा प्रामाणिकपणे करीत करीत, कामगार शिक्षक या माध्यमातून कामगारांना
हक्काबरोबर कर्तव्याची जाणीव करून देण्याचे काम केले. कामगार संघटनेच्या माध्यमातून
कामगारांना न्याय हक्क प्राप्त करून घेण्यासाठी मार्गदर्शन केले. रेल्वे
कामगाराच्या सोलापूर, हुबळी,गुंडकल,सिकंदराबाद, विजयवाडा या विविध विभागातील हजारो
सभासद असलेल्या पतसंस्थेचे सोलापूर विभागातील सभासदा तर्फे नऊ वर्ष संचालक होते. या
माध्यमातून केलेले कार्य आजही अनेकांच्या स्मरणात आहे. *सुसंस्कृत कुटुंब आणि
मुलांची साथ*.---- श्री. सुरेशजींच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांची पत्नी सौं. विमल
यांची खंबीर साथ लाभली. श्री सुरेशजी यांच्या वडिलांचे अकाली निधन झाले. श्री
सुरेशजीने लहान बंधू प्रकाश रंगनाथ महामुनी यांना उच्चशिक्षित केले लहान बंधूंनी
आपली कारकीर्द दूरसंचार विभागात टेलिफोन सुपरवायझर पदावर सुरू करून *उपमहाप्रबंधक*
म्हणून सेवानिवृत्त झाले. ते कवी,कथा लेखक आहेत. साहित्य क्षेत्रात त्यांचा चांगला
नावलौकिक आहे. श्री सुरेशजींचे दोन्ही सुपुत्र चि.जितेंद्र व चि.अजित त्यांनी
निवडलेल्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करत आहेत. त्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट
कार्याचे कौतुक त्या त्या विभागातर्फे श्रीलंका,सिंगापूर मलेशिया, दुबई,हॉंगकॉंग
इत्यादी परदेशात आयोजित समारंभात केलेले आहे. श्री.जितेंद्र योगशिक्षक, शंखवादक
आहेत. श्री सुरेशजी यांच्या *82 वर्षाच्या या अमृत महोत्सवी* टप्प्यावर सुरेशजींची
व सौ.विमलताई यांची दोन्ही मुले चि.जितेंद्र व चि. अजित आणि सुना सौ.मीरा व
सौ.सारिका सर्वजण अत्यंत निष्ठेने प्रेमाने त्यांची काळजी घेत असून त्यांनी आजच्या
पिढीसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. श्री सुरेश राव यांची कन्या सौ.संध्या परेश
नायगावकर बारामती येथे असून जावई डॉक्टर परेश विजयकुमार नायगावकर यांचे बारामती
येथे वैद्यकीय क्षेत्रात उत्तम नावलौकिक आहे.श्री सुरेश राव यांचे दोन्ही नातू
डॉक्टर प्रज्ञेश व डॉक्टर सोहम बारामती येथे वैद्यकीय क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करत
आहेत. *सामाजिक बांधिलकी आणि योगदान* --- श्री. सुरेशजी महामुनी यांचे सामाजिक
योगदान आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी श्री. कालिकादेवी मंदिर समितीचे
अध्यक्ष म्हणून अत्यंत निष्ठेने कार्य केले असून मंदिराच्या प्रगतीत त्यांचा मोलाचा
वाटा आहे. आजही ते सामाजिक कार्यात तितक्याच उत्साहाने सक्रिय असतात. त्यांच्या
शब्दाला समाजात मान असून त्यांचा दांडगा अनुभव समाज प्रबोधनासाठी उपयुक्त ठरत आहे.
श्री. सुरेशजींना समाज गौरव, समाजभूषण, जेष्ठ समाज रत्न आदी पुरस्काराने सोनार समाज
संस्थेने गौरविले आहे. *शिस्त, संयम आणि सेवाभावाचे मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या
आदरणीय श्री. सुरेशराव महामुनी साहेब यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो अशी
ईश्वर चरणी प्रार्थना*. 🌹🌹🌹🌹 वसंत पोतदार सोलापूर मोबा. 9423065915
