*श्री संत नरहरी सोनार समाज सेवा मंडळ,* विजापूर रोड, सोलापूर ( रजि. नंबर एफ 4779
( सोलापूर) दि. 25-01-1996) -------------------------------------------
........................................... पांचाळ सोनार ( विश्वब्राह्मण)
समाजाची सोलापुरात एक सेवाभावी संस्था असावी या उद्देशाने सोलापूर मधील कांही
ज्येष्ठ समाजसेवक एकत्र येऊन , श्री *संत नरहरी सोनार सेवा मंडळ*, विजापूर रोड,
सोलापूर, या संस्थेची स्थापना दि. 25 जनवरी, 1996 रोजी, केली. या संस्थेच्या
स्थापनेस दि. 25 जनवरी, 2026 रोजी, 30 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने,
संस्थेच्या कार्याचा उहापोह करण्याचा एक प्रयत्न. या संस्थेची स्थापना करणे कामी,
कै. बाबुराव वि. पोतदार, श्री दत्तात्रेय उळेकर, कै. डॉ. रामचंद्र गंगाधर टंकसाली,
श्री. श्यामसुंदर ना. पंडित, श्री चंद्रशेखर बा. कव्हेकर, श्री दिलीप ना.
क्षीरसागर, कै. मुरलीधर पंढरीनाथ धोत्रीकर, श्री सुहास शं. पंडित, श्री सुनील शं.
पंडित, श्री चंद्रकांत रा. वेदपाठक, श्री वसंतराव रा. पोतदार, श्री मनोज र. पोतदार,
कै. विलास कि. मैॅदगीॅकर, श्री गणेश शि. वेदपाठक, आदी ज्येष्ठ मंडळी एकत्र येऊन
संस्थेची स्थापना करण्यास हातभार लावला. संस्थापक समस्यांनी,संस्था स्थापनेची कांही
उद्दिष्टे ठरून घेतली होती. ती उद्दिष्टे साध्य करणे करिता संस्थापक सदस्यांनी खूप
मोठे परिश्रम घेतले. संस्थेचे प्रथम संस्थापक अध्यक्ष कै. श्री बाबुराव पोतदार ,
उपाध्यक्ष श्री. देवीदास उळेकर, कार्यवाह म्हणुन श्री चंद्रशेखर कव्हेकर श्री
श्यामसुंदर पंडित, व इतर सर्व संचालकांनी दरवर्षी श्री संत नरहरी सोनार, यांची
पुण्यतिथी उत्साहात साजरी करताना सर्व समाजास एकत्र आणण्याचा प्रयत्न केला . या
नंतर दि. 21-01-2001 रोजी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली, त्यात
खालील प्रमाणे नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या सर्वसाधारण सभेत श्री
विनायक रंगनाथ कव्हेकर, यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी कै. जालिंदर महामुनी, सचिव म्हणुन श्री रामचंद्र भास्कर तपासे, उपसचिव
श्री गिरीश जमखंडीकर, खजिनदार श्री चंद्रकांत सिद्धेश्वर वेदपाठक, सहखजिनदार श्री
विनोद बाबुराव पोतदार व ईतर कार्यकारी संचालक मंडळीनी , संस्थेची धुरा सांभाळली.
यांच्या नेतृत्वाखाली समाजाला एकत्र आणून, सामाजिक ऐक्य साधून बर्याच प्रमाणात
सामाजिक कार्य केले. त्यांच्या कार्यकाळात, त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख,
आवर्जून सर्व समाज बांधवा समोर आणणे योग्य राहील, या करिता त्यांनी केलेल्या
कार्याचा उल्लेख खालील प्रमाणे करता येईल. 1 *. समाज बांधवाना एकत्र आणणे...* सर्व
प्रथम संस्थेने सर्व समाज बांधवांना सामाजिक कार्याच्या निमित्ताने एकत्र आणून
समाजाशी सुसंवाद साधला, विखुरलेल्या समाजात एकजुटता आणली. त्यामुळे सामाजिक कार्य
करणे सोईचे झाले. 2 *. वधू वर मेळाव्याचे आयोजन करणे* त्या काळात आपल्या समाजा
मार्फत *वधू वर* मेळावे भरविण्याची गरज होती, अशावेळी संस्थेच्या वतीने दरवर्षी
*वधू वर मेळाव्याचे* यशस्वी आयोजन करण्यात आले. या निमित्ताने समाजातील बर्याच
गरजू *वधू वर* ना या मेळाव्याचा खूप फायदा झाला. या मेळाव्यातून अनेक इच्छुक
उमेदवारांची लग्ने जमली. ही एक उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल. 3. *सामुदायिक उपनयन (
मुंज ) विधीचे आयोजन करणे...* संस्थेने आपल्या समाजा करिता , सामुदायिक मुंजी चे
आयोजन या काळात केले . सोलापूर जिल्ह्यातील आपल्या समाजातील शेकडो बटुं चे उपनयन (
सामुदायिक मुंजी चे ) आयोजन करण्यात येऊन, ते यशस्वी रित्या पार पाडले. याचा लाभ
आपल्या समाजाला झाला. 4. *छंद वर्गांचे आयोजन करणे...* मे महिन्यात शाळांना जेंव्हा
सुट्टी असते, अशा काळात छंद वर्गांचे आयोजन करून सर्व समाजातील लहान मुलापासून ते
थोरांपर्यंत या छंद वर्गांचा लाभ मिळावा या हेतूने या छंद वर्गांचे आयोजन
संस्थेच्या वतीने करण्यात आले. या छंद वर्गात हस्तकला, विणकाम, पेंटिंग, हस्ताक्षर
सुधारणे, मातीच्या खेळण्या, मूर्ती बनवणे , नृत्य कला, रांगोळी वर्ग, अशा जवळ जवळ
50 एक कलां वर्ग भरवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. महिला व पुरुषां
करिता पहाटे/ सकाळी 6 ते 7 पर्यंत योगासन वर्ग व प्राणायाम वर्ग भरवले जात होते,
याचा सर्व तरुण व ज्येष्ठांना याचा फायदा झाला. तसेच, ज्या काळात संगणकाचा वापर
नवीनच होता, अशा काळात संगणकाचे ज्ञान महिलांनाही असावे हा एक प्रामाणिक उद्देश
समोर ठेऊन , या जिदन्यासेपोटी , संस्थेने महिलांसाठी मोफत वर्ग चालविले, याचा
बर्याच महिला वर्गाने याचा फायदा उचलला, हे मंडळाचे उल्लेखनीय कार्य म्हणावे
लागेल. याची नोंद सर्व समाजाने घ्यावी अशी विनंती आहे. या सर्व छंद वर्गातून
उपस्थित असणार्या विद्यार्थ्यांची संख्या हजाराहून अधिक असायची. संस्थेने हे कार्य
सलग 6 वर्षे चालविले. हे संस्थेचे उल्लेखनीय कार्य म्हणता येईल. 5.
*विद्यार्थ्यांंना शालेय साहित्याचे वाटप...* समाजातील विद्यार्थ्यांंना वाह्या
पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य पुरविण्याचे काम संस्थेने केले. 6. *गरीब समाज
बांधव अंत्यविधी करिता अर्थ सहाय्य करणे..* संस्थेने समाजातील गरीब लोकांच्या
अंत्यविधी करिता ही संस्थेने आर्थिक मदत केली आहे. 7. *समाजा करिता श्री संत नरहरी
महाराज मंदिर बांधणे...* संस्थेच्या वतीने जे कार्यक्रम आपण साजरा करीत असतो, त्या
करिता आपल्याला कार्यालय भाड्याने घ्यावे लागते, ते भाडे देण्याकरिता संस्थेचा बराच
पैसा भाड्याच्या रूपाने खर्च होत असतो, तो पैसा वाचावा या उद्देशाने आपल्या समाजाची
कुलदेवी. श्री कालिका देवी तसेच सोनार समाजातील थोर संत शिरोमणी श्री नरहरि सोनार
यांचे मंदिर बांधणे करिता प्रयत्न करावयाचे आहे. हे आपल्या संस्थेचे प्रमुख उद्देश
आहे. जेणे करून आपल्या संस्थेच्या कार्यक्रमाचे आयोजन आपण बांधणाऱ्या मंदिरातून
करता येईल असा एक मानस आपल्या संस्थे मार्फत व्यक्त करण्यात येतआहे. हे संस्थेचे
प्रयत्न संस्थेच्या सुरुवातीच्या पासून आजपर्यंत अखंड चालू आहेत . या करिता एक
वेगळा निधी आपल्या संस्थेस उभा करावयाचा आहे. या कार्यात सर्व समाज बांधवांनी
संस्थेस आर्थिक मदत करून आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन या निमित्ताने सर्व समाज
बांधवाना करीत आहोत. 8. *समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा सत्कार करणे.* तसेच
समाजातील सर्व थरातील आदर्श काम करीत असणारे सर्व समाजसेवक, नगराध्यक्ष, नगरसेवक,
तसेच शैक्षणिक क्षेत्रातील प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, वैद्यकीय क्षेत्रातील
डॉक्टर्स, तसेच वैद्यकीय क्षेत्रात असणारे ईतर मान्यवर, इंजीनियरिंग क्षेत्रातील
शिक्षक, विद्यार्थी आदींची आतापर्यंत त्यांच्याकडून झालेल्या कार्याची दखल घेऊन ,
त्यांचा यथोचित सत्कार संस्थेच्या वतीने वेळोवेळी करण्यात आला आहे. या पुढेही हे
कार्य असेच जोमाने चालू राहील. 9. *रक्तदान शिबिराचे आयोजन करणे...* आपल्या
संस्थेच्या कार्यक्रमाचे वेळी बर्याच वेळा आपण रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात
आले, त्यावेळेस सर्व समाजबांधवांनी देखील या राष्ट्रीय कार्यक्रमास उत्स्फूर्तपणे
समभाग नोंदवलं आहे. 10. *चॅरिटी शो चे आयोजन करणे..* संस्थेच्या ध्येय पूर्ति
करिता, व संस्थेची आर्थिक परिस्थिती सुधारावी या करिता संस्थेने ऑल दी बेस्ट, या शो
चे आयोजन केले होते, त्या वेळी सोलापूर जिल्ह्यातील समाज बाधावा कडून उत्स्फूर्त
प्रतिसाद मिळाला. सन 2006 साली जुन्या कार्यकारिणीची मुदत संपल्यानंतर श्री
चंद्रकांत सिद्धेश्वर वेदपाठक , यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारिणी निवडण्यात
आली. यांच्या नेतृत्वाखाली देखील बरीच उल्लेखनीय समाज कार्य करण्यात आले. यात
मुख्यत्वे करून वधू वर मेळाव्याचे आयोजन, सामुदायिक मुंजी ( उपनयन ), रक्तदान
शिबीर, समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींचा सत्कार, अशी बरीच
उल्लेखनीय कार्य अतिशय उत्तम रित्या पार पडली. सन 2012 सालापासून श्री वसंतराव
पोतदार, हे नवे अध्यक्ष झाल्यानंतरही बरीच उल्लेखनीय कामगिरी केली गेली. आज पर्यंत
जेवढ्या कार्यकारिणी झाल्या त्या सगळ्यांचेच योगदान अतिशय उत्तम प्रकारे संस्थेस.
मिळाले. संस्थेच्या उभारणीत कै. बाबुराव पोतदार, श्री दत्तात्रेय उळेकर, काका, कै.
डाॅ. रामचंद्र गंगाधर टंकसाली. कै. नागनाथ धाराशिवकर, सर, कै. जालिंदर महामुनी, कै.
रमेश पतदार, कै. होनवले मामा, आदी मंडळी कडून बहुमूल्य सहकार्य लाभले. दि. 12
जनवरी, 2026 रोजी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत
अध्यक्ष म्हणुन श्री मिलिंद पंडित, उपाध्यक्ष म्हणुन श्री नीतीश वेदपाठक , सचिव
श्री प्रशांत महामुनी, सहसचिव श्री सोमनाथ पंडित, खजिनदार श्री. मयूर चंद्रकांत
वेदपाठक, सहसचिव श्री धनंजय भा.तपासे, व इतर संचालक मंडळ निवडण्यात आले.
*शब्दांकन*
*विनायक
रंगनाथ कव्हेकर* *माजी अध्यक्ष* श्री संत नरहरी सोनार समाजसेवा मंडळ, विजापूर रोड,
सोलापूर.

